हिंगणघाट शहराबाहेर कड़ाजना मार्गावरती असलेल्या महाकाली नगरी येथे आज विज़न ऑफ लाइफ फॉउंडेशन या तथाकथित एनजीओ नावाचा कंपनी कडून आज कर्ज वाटप मेळाव्याचे आयोजन केले होते.यावेळी या ठिकाणी मोठी बुलडाणा सिंदखेडराजा अमरावती यवतमाळ चंद्रपूर नागपूर वर्धा जिल्ह्यातील नागरिकांनी कर्ज मिळविण्यासाठी हजेरी लावली होती.
याठीकाणी मोठीं गर्दी झाल्याने महसूल विभागाकडून उपविभागिय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांच्या मार्गदर्शनात प्रभारी तहसीलदार समशेर खान पठाण यांनी दंडात्मक कारवाई केली होती.त्यांनर या ठिकाणी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला म्हणजे येथे उपस्थित असलेल्या पैकी कित्येकांकडून या विज़न ऑफ लाइफ फॉउंडेशन या बोगस एनजीओ ५ लाख रुपये कर्ज देण्याच्या नावावर १० हजार २५० रुपये घेऊन नोंदणी करीत जे कारता बॅक इंडोनेशिया या बोगस बॅंकेचे ५ लाख रुपयांचे नकली चेक एटीएम कार्ड देण्यात आले.
ही बाब काही सुदन्य नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी या संबंधी याची माहिती पोलिसांना दिली माहिती मिळताच उपविभागिय पोलिस अधिकारी दिनेश कदम ठाणेदार संपत चव्हान यांनी कार्यक्रम स्थळी जाऊन या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक दिपेश ठाकरे,पपीन रामटेके,अभिषेक बागड़े यांच्याकडून कारवाई सुरू आहे.नेमका हा १०२५० रुपये घेऊन ५ लाख रुपयाचा कर्जाचा चेक देण्याचा प्रकार खरा की खोटा हे आता पोलिस चौकशीत निष्पन्न होणार आहे.