loader
Foto

गूड न्यूज... आयपीएल सप्टेंबरपासून होणार सुरु, तारीख आणि वेळ जाणून घ्या

आयपीएलच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण काही दिवसांपूर्वी आयपीएल युएईमध्ये होणार हे आयपीएलच्या प्रशासकीय समितीच्या अध्यक्षांनी सांगितले होते. आता आयपीएलची तारीख आणि वेळही जाहीर करण्यात आल्याचे समजते आहे.

यापूर्वी आयपीएल २६ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीमध्ये होणार असे समजले होते. त्याचबरोबर आयपीएलचे सामने रात्री आठ वाजता सुरु होणार, असेही सांगण्यात आले होते. पण यामध्ये आता बदल करण्यात आल्याचे समजते. त्याचबरोबर आयपीएल दिवाळीच्या हंगामात खेळवावी, असे आयपीएलचे प्रसारण करणाऱ्या कंपनीला वाटत होते. पण बीसीसीआय मात्र तसे करणार नसल्याचे आत दिसत आहे.

यावर्षी आयपीएल युएईमध्ये होणार आहे. त्याचबरोबर आयपीएल हे २६ सप्टेंबरला आता सुरु होणार नाही, तर १९ सप्टेंबरपासून आयपीएलची सुरुवात होणार असल्याचे समजते आहे. त्याचबरोबर आयपीएलचे सामने रात्री आठ वाजता सुरु होणार, असेही सांगण्यात आले होते. पण युएई आणि भारताची वेळ पाहून आता आयपीएलचे सामना रात्री ७.३० वाजता सुरु करण्यात येणार आहे.

 

यापूर्वीही युएईमध्ये आयपीएल आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे युएईला आयपीएलच्या आयोजनाचा चांगला अनुभव आहे. त्यामुळेच श्रीलंकेचा पर्याय खुला असताना बीसीसीआयने युएईला पसंती दिल्याचे समजत आहे. आता तेथील सरकार आणि क्रिकेट संघटना बीसीसीआयला कसा पाठिंबा देते, यावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत. कारण ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा रद्द होईपर्यंत बीसीसीआय आयपीएल खेळवू शकत नव्हती. पण आता विश्वचषकही पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे आता बीसीसीआय काय करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. पण बीसीसीआयलाही काही मर्यादा आहेत आणि त्यामध्येच राहून त्यांना आपले काम करावे लागणार आहे.

आयपीएलसाठी लागणाऱ्या दोन महिन्यांचा मोठा प्रश्न आता सुटलेला आहे. पण अजूनही बरेच प्रश्न बीसीसीआयला सोडवायचे आहेत. त्यासाठी आता ७-१० दिवसांमध्ये बीसीसीआय एक महत्वाची बैठक बोलावणार आहे. यामध्ये आयपीएलच्या प्रशासकीय समितीचे सदस्य असतील. या बैठकीमध्ये आयपीएल कशी खेळवता येईल, याबाबत सखोल चर्चा करण्यात येणार आहे.

Recent Posts