loader
Foto

किम जोंग यांच्यासाठी चीनचे डॉक्टर उत्तर कोरियात!

वाबीजिंग: उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती असतानाच चीनमधील डॉक्टरांचे एक पथक उत्तर कोरियाला रवाना झाले असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे किम यांच्या प्रकृतीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत.

मागील काही दिवसांपूर्वी किम जोंग उन यांच्यावर कार्डियोवेस्क्युलेरची शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर त्यांची प्रकृती ढासळली असल्याची माहिती समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. राउटरने दिलेल्या वृ्त्तानुसार, किम जोंग उन यांच्या प्रकृतीबाबत चर्चा करण्यासाठी डॉक्टरांचे पथक चीनमध्ये दाखल झाले आहे. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या आंतरराष्ट्रीय विभागाच्या एका वरिष्ठ सदस्याच्या नेतृत्वात हे पथक पाठवण्यात आले आहे. किम जोंग यांच्या प्रकृतीची आढावा घेण्यात येणार असून डॉक्टरांशीदेखील चर्चा करण्यात येणार आहे.

दरम्यान, किम जोंग यांच्या प्रकृतीबाबतच्या उलटसुलट चर्चा, दावे सुरूच आहेत. दक्षिण कोरियातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, किम हे जिवंत असून लवकरच लोकांसमोर येणार आहेत. किम हे लोकांसमोर येत नाहीत, याचा अर्थ त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, असा अर्थ होत नाही असेही या अधिकाऱ्याने म्हटले.

Recent Posts