loader
Foto

US Election अमेरिकेतील निवडणुकीत PM मोदींचे मित्र पराभवाच्या छायेत?

नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅट पक्षाचे उमेदवार जो बायडन यांच्यात सरळ लढत होणार आहे. या निवडणुकीत ट्रम्प यांना पराभवाचा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. निवडणूकपूर्व सर्वेक्षणात जो बायडन यांना सर्वाधिक मतदारांची पसंती असल्याचे समोर आले आहे.

बायडन यांना ५७ टक्के आणि ट्रम्प यांना ४१ टक्के मतदारांनी पसंती दर्शवली आहे. मिनेसोटामध्ये ही बायडन यांना आघाडी आहे. ट्रम्प यांनी आपल्या निवडणूक प्रचारात मिनेसोटामध्ये आघाडी घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी प्रचारासाठी मोठा निधीही गुंतवला आहे. ट्रम्प यांना या ठिकाणाहून १.५ गुणांनी पराभव स्विकारावा लागला होता.

ट्रम्प यांनी मागील निवडणुकीत विजय मिळवलेल्या काही राज्यामध्ये सध्या बायडन यांची आघाडी आहे. यामध्ये अॅरिजोना, मिशिगन, पेन्सिलवेनिया, विस्कॉन्सिन या राज्यांचा समावेश आहे. मागील निवडणुकीत हिलरी क्लिंटन यांनी विजय मिळवलेल्या राज्यांचा समावेश केल्यास बायडन यांच्याकडे २९० इलेक्टोरल व्होट होतील. फ्लोरीडा आणि उत्तर कॅरिलोना सारख्या राज्यातही बायडन यांना आघाडी आहे. या राज्यांचाही समावेश केल्यास त्यांच्याकडे ३३० इलेक्टोरल व्होट होतील.

Recent Posts