loader
Foto

विषयाचे भलतेच 'गांभीर्य'; नारळाच्या झाडावर चढून मंत्र्यांनी दिले भाषण!

कोलंबो: अपवाद वगळता राजकीय नेते भाषण करण्यासाठी कायमच उत्सुक असतात. आपण करत असलेले भाषण लोकांच्या पसंतीस उतरावे यासाठी शाब्दिक कोट्याही करतात. तर, काहीजण विषयाचे गांभीर्य लोकांना समजावे यासाठी भाषणात किचकट मुद्दे सोप करून सांगतात. तर, आणखी काही मार्ग अवलंबतात. श्रीलंकेतील मंत्री भाषण करण्यासाठी चक्क नारळाच्या झाडावर चढले. त्याला कारणही तसेच होते.

श्रीलंकेत सध्या नारळाची मोठी टंचाई आहे. त्यामुळे लोकांमध्ये सरकारबद्दल काहीशी नाराजीदेखील आहे. त्यामुळे या विषयावर बोलण्यासाठी श्रीलंकेचे नारळ खात्याचे राज्यमंत्री अरुंदिका फर्नांडो यांनी नारळाच्या कमतरतेबद्दल लोकांना सांगण्यासाठी नारळाच्या झाडावर चढले. त्यांनी सांगितले, स्थानिक उद्योगांकडून वाढती मागणी आणि घरगुती वापरामुळे श्रीलंकेत सध्या ७०० दशलक्ष नारळाची कमतरता भासत आहे. त्यावर मात करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

श्रीलंकेचे राज्यमंत्री अरुंदिका फर्नांडो यांनी म्हटले की, नारळाच्या उत्पादनसाठी उपलब्ध असलेल्या जमिनीचा योग्य वापर होईल आणि नारळ उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. जेणेकरून सरकारला मोठ्या प्रमाणावर परदेशी चलन मिळेल.

Recent Posts