loader
Foto

मध्य-पूर्व भागात मैत्री पर्व; युएई, बहरीन व इस्रायल यांचा करार

संयुक्त अरब अमिराती, बहरीन या देशांनी इस्रायलसोबतच्या मैत्री करारावर स्वाक्षरी केली आहे. या करारामुळे आता मध्य-पूर्व भागात मैत्री पर्व सुरू झाले असल्याचे बोलले जात आहे. अनेक वर्षांपासूनचे वैर विसरून अरब देशांनी इस्रायलसोबत मैत्री करार केला आहे. अमेरिकेची मध्यस्थी याकामी अतिशय महत्त्वाची ठरली. करारावर स्वाक्षरी होताना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि संयुक्त अरब अमिराती आणि बहरीन या देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या करारामुळे मध्य पूर्व भागात नवी सुरुवात झाली असून यामुळे आता जगातील अतिशय महत्त्वाच्या भागात शांतता प्रस्थापित होणार असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक दशकांचा संघर्ष, वादानंतर आता आपण एका नवीन मध्य पूर्व भागाची सुरुवात करत असल्याचे त्यांनी म्हटले. इस्रायल, युएई आणि बहरीन या देशांमध्ये आता दूतावास सुरू करण्यात येणार असून मित्र देश म्हणून एकत्र काम करणार आहेत.

Recent Posts