loader
Foto

जपाननंतर इंडोनेशियानेही चीनला हुसकावले; दक्षिण चीन समुद्रात तणा

दक्षिण चीन समुद्र पुन्हा एकदा तणावाचे केंद्र तयार झाले आहे. चीनच्या वाढत्या आगळकीला इतर देशांकडूनही उत्तर देण्यास सुरू झाले आहे. इंडोनेशियाने आपल्या हद्दीत घुसलेल्या चीनच्या गस्ती पथकाला पिटाळून लावले आहे. या घटनेनंतर आता दोन्ही देशातील तणाव वाढला आहे. चीनकडून पलटवार होण्याची शक्यता गृहित धरून इंडोनेशियाने युद्धनौकांची गस्त वाढवली आहे. या भागात चिनी युद्धनौकांची हालचाल सुरू असल्याचे समोर आले.

याआधी जपानने आपल्या हद्दीत घुसलेल्या चीनच्या पाणबुडीला पिटाळून लावले होते. इंडोनेशियाने चीनच्या गस्ती पथकाच्या जहाला नातुना बेटाजवळून हुसकावून लावले आहे. हा भाग इंडोनेशियाच्या विशेष आर्थिक भागात येतो. इंडोनेशियाच्या समुद्र सुरक्षा यंत्रणांना चीनचे जहाज आपल्या हद्दीत शिरले असल्याची माहिती शुक्रवारी रात्री समजली. त्यानंतर इडोनेशियाने आपले एक जहाज चीनच्या या गस्ती जहाजाजवळ पाठवले.

इंडोनेशिया आणि चीनच्या जहाजात एक किलोमीटरच्या अंतरावरून चर्चा झाली. त्यानंतर इंडोनेशियाने चीनच्या जहाजाला त्या परिसरातून निघून जाण्यास सांगितले. मात्र, चीनच्या जहाजाने हा भाग आमच्या हद्दीत येत असल्याचे म्हटले. त्यानंतर आक्रमक पवित्रा घेऊन इंडोनेशियाच्या जहाजाने चीनच्या जहाजाला पिटाळून लावले.

Recent Posts