loader
Foto

नेहरू नव्हे तर 'या' नेत्याला हवी होती फाळणी; पाकिस्तानी लेखकाचा दावा!

भारताच्या फाळणीसाठी अनेक तर्क आणि दावे केले जातात. इतकंच नव्हे तर देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिले पंतप्रधान होण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू हे आग्रही होते आणि त्यासाठी फाळणी झाली तरी चालेल असा तर्क दिला जातो. मात्र, फाळणीसाठी मोहम्मद अली जिना यांचा हट्टीपणा कारणीभूत असल्याचे पाकिस्तानी वंशाचे राज्यशास्त्राचे संशोधक इश्तियाक अहमद यांनी दावा केला आहे.

भारताची फाळणी होऊ नये यासाठी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या नेतृत्वातील काँग्रेस पक्ष आग्रही होते. मात्र, मुस्लिम लीगचे नेते मोहम्मद अली जिना हे फाळणीवर अडून बसले होते. जिना यांनी काँग्रेसला हिंदूचा पक्ष, तर महात्मा गांधी यांना 'हुकूमशहा' असल्याचे सिद्ध करण्यासाठी एकही संधी गमावली नाही.

इश्तियाक यांनी सांगितले की, २२ मार्च १९४० मध्ये लाहोरमध्ये मोहम्मद अली जिना यांनी आपले अध्यक्षीय भाषण दिले होते. त्यानंतर २३ मार्च रोजी ठराव मंजूर करण्यात आला. या दिवसानंतर जिना अथवा मुस्लिम लीग यांनी एकदाही अखंड भारताचा स्वीकार करण्याची इच्छा व्यक्त केली नाही. त्यावेळी फेडरल व्यवस्था अतिशय कमकुवत होती आणि मोठ्या प्रमाणावर ताकद ही प्रांतीय सरकारांच्या हाती एकवटलेली होती.

Recent Posts