loader
Foto

लेबनॉन: बैरूत बंदरावर पुन्हा भीषण आग; स्फोटाच्या कटू आठवणी दाटल्या!

बैरूत: जवळपास एक महिन्याआधी भीषण स्फोटांनी उद्धवस्त झालेल्या बैरूत बंदरावर पुन्हा एकदा आग लागली. गुरुवारी बैरूत बंदरावर आगीचा उंच लोळ दिसल्याने स्थानिकांच्या मनात भीती निर्माण झाली. या आगीच्या वेळी कोणताही स्फोट झाला नसल्याची माहिती आहे. त्याशिवाय कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.

मागील महिन्यात बैरूत बंदरावर झालेल्या स्फोटात जवळपास १५० जणांचा मृत्यू झाला होता. तर, सहा हजारांहून अधिक जखमी झाले होते. या बंदर परिसरातील अनेक इमारती उद्धवस्त झाल्या होत्या. त्यानंतर गुरुवारी बैरूत बंदराजवळ आगीचे प्रचंड लोळ दिसले. त्यामुळे अनेकांना स्फोटाचीच आठवण झाली. ही आग कशी लागली, याबाबत अधिक स्पष्ट माहिती समोर आली नाही. या ठिकाणी इंधन आणि टायर जाळल्यामुळे हे आगीचे लोळ उठले असावेत अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. या स्फोटात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

Recent Posts