loader
Foto

करोना: १५० हून अधिक लशींवर संशोधन; 'अशी' आहे लस विकसित करण्याची पद्धत

करोनाच्या संसर्गाने जगभरात थैमान घातले आहे. करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जगभरात सध्या १५० हून अधिक लशींवर संशोधन सुरू आहे. लस विकसित करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. याद्वारे मानवी शरीरातील SARS-CoV-2 ओळखण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. आपल्या शरीरातील पेशींवर ACE-2 रिसेप्टर असतात. जे विषाणूवर असलेल्या स्पाइक प्रोटीनचे लक्ष्य असतात. यांचा प्रतिकार करून विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करतात. शरीरात दाखल झाल्यानंतर विषाणू आपली संख्या वाढवतो आणि संसर्ग शरीराच्या इतर भागात पोहचतो. या विषाणूंशी लढण्यासाठी आपल्या शरीरात अॅण्टीबॉडी आणि टी-सेल असतात. लशीद्वारे कोणत्याही संसर्गाशिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे आव्हान आहे. जवळपास आठ ते दहा लशींची चाचणी अंतिम टप्प्यात आली आहे. रशियाने आपल्या देशात सामान्यांसाठी लस उपलब्ध केली आहे. तर, चीनने लष्करातील जवानांना लस देण्यास सुरुवात केली आहे.

Recent Posts