loader
Foto

आनंदवार्ता! भारतात दाखल होणार रशियन लस; क्लिनिकल चाचणी सुरू होणार

करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी रशियाने विकसित केलेली 'स्पुटनिक व्ही' ही लस भारतात दाखल होणार आहे. याच महिन्यात ही लस भारतात येणार आहे. या लशीची अंतिम टप्प्यातील चाचणी भारतातही होणार आहे. रशियाने करोनाच्या संसर्गाला अटकाव करणारी विकसित केलेली लस ही प्रभावी आणि सुरक्षित असल्याचे समोर आले आहे. लस चाचणीच्या पहिल्या दोन टप्प्यात ही लस अतिशय सुरक्षित असल्याचे आढळले आहे. लस उत्पादन करण्यासाठी निधी जमवणारी संस्था रशियन डायरेक्ट इनवेस्ट फंडचे सीईओचे किरील दिमित्री यांनी सांगितले की, या लशीची क्लिनिकल चाचणी भारतासह युएई, सौदी अरेबिया, फिलिपीन्स आणि ब्राझीलमध्ये होणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील लस चाचणीचा प्राथमिक अहवाल ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये जाहीर करण्यात येणार आहे.

रशियाने विकसित केलेली 'स्पुटनिक व्ही' ही करोनावरील लस सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे. या आठवड्यांपासून ही लस देण्यात येणार आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी ११ ऑगस्ट रोजी या लशीला मंजुरी दिली असल्याची घोषणा केली होती. या लशीला मॉस्कोच्या गामलेया रिसर्च इन्स्टिट्यूटने संरक्षण मंत्रालयासोबत विकसित केली आहे. मेडिकल वॉचडॉग असणाऱ्या Roszdravnadzor संस्थेमध्ये गुणवत्तेची तपासणी होणार आहे. त्यानंतर या आठवड्यात ही लस सामान्यांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

Recent Posts