loader
Foto

करोना: लशीसाठी भारताची WHO सोबत चर्चा; कोवॅक्समध्ये सहभागी होणार!

करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लस विकसित करण्याचे अनेक देश प्रयत्न करत आहेत. तर, दुसरीकडे लस विकसित झाल्यानंतर त्याचे योग्य वितरण झाले पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जागतिक आरोग्य संघटना आणि भारता दरम्यान करोना लशीबाबत चर्चा सुरू आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे वरिष्ठ सल्लागार ब्रूस आयलवर्ड यांनी ही माहिती दिली. कोवॅक्स (COVAX)फॅसिलिटीचा हिस्सा बनण्यासाठी भारतदेखील पात्र असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.

जागतिक आरोग्य संघटना आणि 'गावी द वॅक्सीन अलायन्स' (GAVI) या कोवॅक्स फॅसिलिटीचे नेतृत्व करत आहेत. या माध्यमातून जगभरात करोनाला अटकाव करणाऱ्या लस खरेदी करणे आणि त्याच्या लस वितरणात मदत करण्यात येणार आहे. अमेरिकेसह अनेक देशांनी लस विकसित करणाऱ्या अनेक कंपन्यांसोबत थेट लस खरेदीचा करार केला आहे. या देशांनी कराराद्वारे लस पुरवठ्याची खात्री केली आहे.

लशीवर डॉ. हर्षवर्धन यांनी काय म्हटले होते?
भारताचे आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मागील महिन्यात म्हटले की, या वर्षाच्या अखेरपर्यंत भारतात पहिली लस उपलब्ध होऊ शकते. कोविड-१९वरील एक लस क्लिनिकल चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. या वर्षाच्या अखेरीस भारतात लस उपलब्ध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.

Recent Posts