loader
Foto

ट्रम्प यांना सट्टेबाजांची पसंती; तर, सर्वेक्षणात बायडन आघाडीवर

नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. रिपब्लिकन पक्षाच्यावतीने विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅट पक्षाच्यावतीने माजी उपराष्ट्रपती जो बायडन यांच्यात सरळ निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या विजयासाठी सट्टेबाजांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पसंती दर्शवली आहे. तर, निवडणूक सर्वेक्षणात बायडन यांनी पसंती मिळाली आहे.

अमेरिकेत राष्ट्रीय अथवा स्थानिक निवडणुकीसाठी सट्टेबाजी अवैध आहे. त्यामुळे सट्टेबाजीशी निगडीत सर्व व्यवहार परदेशी वेबसाइटवर होत आहेत. निवडणूक सट्टेबाजी बेकायदेशीर असल्यामुळे अमेरिकन नागरीक गुप्तपणे सट्टा लावत आहेत. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, सट्टेबाजारानुसार ट्रम्प यांच्यावर पैसे लावणाऱ्यांना ९० टक्के अधिक फायदा होणार असल्याचे चित्र आहे..

एका ब्रिटीश सट्टेबाजाने सांगितले की, ट्रम्प यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. ट्रम्प यांच्या बाजूने आतापर्यंत सुमारे ९५ कोटींहून अधिक रुपये लावण्यात आले आहेत. तर, आयलँडच्या एका सट्टेबाजानुसार ट्रम्प यांच्यावर मोठ्या प्रमाणावर पैसे लावण्यात आले आहे. त्यामुळे सट्टा बाजारातील मंदी काही प्रमाणात कमी झाली आहे. ट्रम्प यांच्यावर सर्वाधिक पैसे लावले जात असल्याचे ऑस्ट्रेलियन सट्टेबाजाने सांगितले.

Recent Posts