loader
Foto

Coronavirus vaccine ट्रम्प यांचा वॅक्सीन स्ट्रोक? 'या' दिवशी अमेरिकेत येणार लस!

करोनाच्या थैमानाशी दोन हात करत असलेल्या अमेरिकेतील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या काही तासांपूर्वी अमोरिकेत लस मिळणार असल्याची चर्चा आहे. लस विकसित करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असून त्याच्या वितरणाशी संबंधित तयारीदेखील करण्यात आल्या आहेत. अमेरिकेत ३ नोव्हेंबर रोजी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आहे.

अमेरिकेतील राज्य प्रशासनाला लस वितरणासाठी सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अॅण्ड प्रीव्हेंशनचे ( सीडीसी) संचालक रॉबर्ट रेडफिल्ड यांनी २७ ऑगस्ट रोजी लिहिलेल्या पत्रानुसार, करोना लस वितरण करण्यासाठीचे परमिट मिळवण्यासाठी एका निश्चित वेळेची आवश्यकता आहे. सार्वजनिक आरोग्यविषयक मोहीमेतील हा मुख्य अडथळा आहे. 'सीडीसी'ला करोना लस वितरणाच्या सुविधेसाठी मदतीचे आवाहन त्यांनी राज्यांना पत्राद्वारे केले आहे.

सीडीसी आणि आरोग्य तज्ञांच्या एका सल्लागार समिती एका रँकिंग व्यवस्थेवर काम करत आहे. ज्याच्या आधारे लस देण्यात येणार आहे. सीडीसीने अमेरिकन राज्यांना एक लस रोलआउट करण्याच्या योजनेचा तपशील दिला आहे. त्यानुसार, आपात्कालीन वापरासाठी अथवा सर्वांच्या वापरासाठी लस उपलब्ध होणार असल्याचे संकेत दिले आहेत. या दस्ताऐवजांनुसार, लशीचा डोस दिल्यानंतर काही आठवड्यानंतर 'बुस्टर' डोसची आवश्यकता भासणार आहे. त्याशिवाय ही मोफत उपलब्ध करून देण्यात येण्याचीही माहिती आहे.

Recent Posts