loader
Foto

India China भारताच्या आक्रमकतेने चीनचा थयथयाट; केली 'ही' अजब मागणी!

लडाखमधील पॅन्गाँग सरोवराजवळ २९-३० ऑगस्टच्या रात्री भारतीय सैन्याने चिनी सैन्याला जोरदार प्रत्युत्तर देत त्यांच्या घुसखोरीचा डाव हाणून पाडला. त्यानंतर आता चीनचा थयथयाट सुरू झाला आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्यासाठी चीनने भारताकडे अजबच मागणी केली आहे. भारताने या भागातील सैन्य त्वरीत मागे घ्यावे असे चीनने म्हटले आहे. याआधी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने पॅन्गाँग सरोवराजवळ झालेल्या घुसखोरीचा भारताचा दावा फेटाळून लावला.

चीन सरकारचे वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सने पीपल्स लिबरेशन आर्मीच्या हवाल्याने म्हटले की, भारतीय सैन्याने दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या चर्चेत सहमती झालेल्या निर्णयाचे उल्लंघन केले आहे. सोमवारी भारतीय सैन्याने जाणूनबुजून प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडलू असल्याचा आरोप ग्लोबल टाइम्सने केला आहे. भारताची ही कृती चीनला उकसवण्यासाठी होती असेही त्यांनी म्हटले.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजीन यांनी सांगितले की, चीनच्या सैन्याने कायमच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (एलएसी) नियमांचे पालन केले आहे. त्यांनी कधीच एलएसी ओलांडली नसल्याचाही हास्यास्पद दावा केला. भारत-चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये सध्याच्या परिस्थितीबाबत चर्चा सुरू असून दोन्ही देश राजनयिक आणि लष्कराच्या माध्यमातून संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.

Recent Posts