loader
Foto

'ब्लॅक पँथर'चा जगाला अलविदा, चॅडविक बोसमनची कॅन्सरसोबतची झुंज अपयशी!

हॉलिवूड स्टार चॅडविक बोसमन म्हणजेच जगप्रसिद्ध 'ब्लॅक पँथर'चं आज (29 ऑगस्ट) निधन झालं. चॅडविक हा गेल्या चार वर्षापासून कोलोन कॅन्सरशी अर्थात आतड्याच्या कर्करोगाशी झुंज देत होता आणि अखेर त्याची ही झुंज अपयशी ठरली. लॉस एंजलिसमधील राहत्या घरी त्याने वयाच्या 43 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. चॅडविक बोसमनच्या अंतिम काळात त्याची पत्नी आणि कुटुंबसोबत होतं.

मार्वेल स्टुडिओ फिल्मचा हा एक लाडका अभिनेता होता. त्याच्या निधनानंतर मार्वेल स्टुडिओसह अनेक हॉलिवूड कलाकार, निर्माते आणि चॅडविकचे जगभरातले फॅन्स आपल्या भावना व्यक्त करत आहेत, त्याला श्रद्धांजली वाहत आहेत.

"चॅडविक हा एक खरा फायटर होता, तो आपलं काम सांभाळत या आजाराशी चार वर्ष लढल, मार्शल चित्रपटापासून ते 'डा 5' या चित्रपटापर्यंत, मा रॅनीज् ब्लॅक बॉटम आणि बरेच चित्रपट त्याने कॅन्सरसाठीची शस्त्रक्रिया आणि केमोथेरपी सुरु असताना चित्रित केले आणि 'ब्लॅक पँथर' या चित्रपटातील किंग टी'चला (King T'Challa) या पात्राने त्याच्या करिअरला एका वेगळ्या उंचीरवर नेऊन ठेवलं", असं त्याच्या कुटुंबाने म्हटलं.

Recent Posts