loader
Foto

जपान जगाला ताकद दाखवणार; लोकसंख्येच्या चार पट करोना लस मागवल्या

करोना व्हायरसवर मात करुन पुन्हा पूर्वपदावर येण्यासाठी जपानने कंबर कसली आहे. आपल्या लोकसंख्येच्या चार पट एवढ्या करोना लसीचे डोस जपानने मागवले आहेत. यामुळे पुढील वर्षीच्या नियोजित ऑलिम्पिक आयोजनासाठी मदत मिळेल, असा विश्वास जपानला आहे. इतर श्रीमंत राष्ट्रांप्रमाणेच जपानही करोना लस मिळवण्यासाठी विविध देशांसोबत करार करत आहे. कारण, काही लसी वैद्यकीय चाचणीत अयशश्वी होऊ शकतात, तर काही लसींना विलंब होऊ शकतो. त्यामुळे जपान विविध देशांकडे लस मागत आहे.

जपानचे पंतप्रधान शिंजे आबे प्रकृतीच्या कारणास्तव पदावरुन पायउतार होत आहेत. पण टोकियोमध्ये जगभरातील खेळाडूंना आणून ऑलिम्पिक सुरळीत पार पाडणं त्यांचं स्वप्न आहे. करोनामुळे ऑलिम्पिकवर अगोदरच परिणाम झाला आहे. पण तरीही जपान सरकारने जिद्द मात्र सोडलेली नाही. लोकसंख्येच्या चार पट डोस आणून देशाची सुरक्षा सुनिश्चित केली जात आहे.

मुख्य कॅबिनेट सचिव आणि सरकारचे महत्त्वाचे प्रवक्ते योशिहिडे सुगा यांनी दिलेल्या माहितीनुसार, जपान सध्या ऑलिम्पिक आयोजकांसोबत बातचित करुन स्पर्धा भरवण्याबाबत चर्चा करत आहे. त्यामुळेच लस जास्त प्रमाणात असेल याची सुनिश्चिती केली जात आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत विविध कंपन्या लस निर्मिती करणं अपेक्षित असल्याचं सुगा म्हणाले. बरंच काही ग्रहित धरलं जात आहे. पण आम्हाला कोणत्याही परिस्थितीत ऑलिम्पिक भरवायची आहे, असं ते म्हणाले.
 

Recent Posts