loader
Foto

पाकिस्तानला पावसाचा तडाखा; ९० जणांचा मृत्यू, कराचीत पूर सदृष्य स्थिती

मागील काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे पाकिस्तानमध्ये हाहाकार उडाला आहे. पाकिस्तानचे आर्थिक केंद्र समजले जाणारे कराची शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली असून अनेक घरे पाण्याखाली गेले आहे. पाकिस्तानात जवळपास १०० जणांचा मृत्यू झाला असून हजारोजण बेघर झाले असल्याची माहिती पाकिस्तानच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

पावसाचा मोठा फटका कराची शहराला बसला. अनेक ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणावर साचले होते. त्यामुळे अनेकजणांना घरी पोहचता आले नाही. सर्वाधिक जीवितहानी सिंध प्रांतात झाली असून, तेथे मृतांची संख्या ३१ झाली आहे. खैबर पख्तुनख्वा प्रांतात २३ जणांचा मृत्यू झाला आहे. बलुचिस्तानमध्ये १५, तर पंजाबमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर पाकिस्तानमधील मृतांची संख्या १३ वर पोहोचली असून, पाकव्याप्त काश्मीरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे. या आठवड्यातही कराचीत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कराचीत ५० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडल्यामुळे सखल भागात पाणी साचले असल्याचे हवामान विभाग प्रमुख सरदार सरफराज यांनी सांगितले.

Recent Posts