loader
Foto

व्वा! AI च्या मदतीने पन्नास नव्या ग्रहांचा शोध

अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेच्या (नासा) उपग्रहांकडून येणाऱ्या माहितीचे कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (Artificial Intelligence) विश्लेषण करून सुमारे ५० संभाव्य ग्रहांचा शोध लावल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. यातील काही ग्रह 'नेपच्युन'इतके मोठे असून, काही पृथ्वीपेक्षा लहान आहेत.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर प्रथमच उपग्रह शोधण्यासाठी करण्यात आला आहे. वॉर्विक विद्यापीठातील खगोलशास्त्रज्ञ आणि संगणक संशोधकांनी हा शोध लावला आहे. केप्लर या अमेरिकी यानाकडून सातत्याने मोहिती पाठविली जाते. तिचे विश्लेषण करण्यासाठी एक मशीनसाठीचा 'अल्गोरिदम' तयार करण्यात आला. येणाऱ्या माहितीतून खरा ग्रह कसा ओळखायचा आणि कोणता खोटा असू शकतो, यासाठीचे आडाखे संगणकाला पुरविण्यात आले. त्या आधारे आलेल्या माहितीचे पृथक्करण करून सुमारे ५० ग्रह असावेत, असा कयास या संशोधकांनी बांधला आहे. यातील काही ग्रह लहान आणि काही मोठे आहेत. काहींची परिवलन कक्षा २०० दिवस तर काहींची एक दिवस आहे.

या प्रयोगाबाबत वॉर्विक विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. डेव्हिड आर्मस्ट्राँग म्हणाले, 'मशीन लर्निंगद्वारे ग्रह निश्चितीचा प्रयोग प्रथमच करण्यात आला आहे. आता सांख्यिकीच्या मदतीने खरा ग्रह अचूकपणे ओळखता येणार आहे. यात चुकीचे प्रमाण फक्त एक टक्का आहे.'

Recent Posts