loader
Foto

जगातील सर्वाधिक वयाच्या व्यक्तीचे निधन; करोनामुळे शेवटची इच्छा अपूर्ण!

जगातील सर्वाधिक वयाची व्यक्तीचे निधन झाले. फ्रेडी ब्लोम यांनी अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच आपला ११६ वा वाढदिवस साजरा केला होता. त्यांचा जन्म १९०४ मध्ये झाला होता. करोनाच्या संसर्गामुळे त्यांची शेवटची इच्छा मात्र अपूर्णच राहिली.

फ्रेडी यांना सिगारेट ओढण्याचा शौक होता. मात्र, करोनाच्या संसर्गामुळे लॉकडाउन असल्यामुळे त्यांना तंबाखू मिळाला नाही. त्यामुळे त्यांना आपली शेवटची सिगारेट बनवता आली नाही. देवाच्या कृपेने इतकी वर्षे जगलो असल्याचे त्यांनी आपल्या ११६ व्या वाढदिवशी फ्रेडी यांनी सांगितले. आपल्या ११६ व्या वाढदिवशी त्यांनी एक सिगारेट ओढण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, लॉकडाउनमुळे तंबाखू मिळाली नाही. दक्षिण आफ्रिकेत लॉकडाउनमुळे दारू आणि सिगारेटवर बंदी आहे. जेणेकरून दारू प्यायल्यामुळे होणाऱ्या मारहाणीच्या संख्येत घट व्हावी आणि रुग्णालयात कमी प्रमाणात जखमी दाखल व्हावे.

फ्रेडी यांनी ८ मे रोजी रोजी आपला ११६ वा वाढदिवस साजरा केला होता. फ्रेडी यांच्या संपूर्ण कुटुंबीयांचा १९१८ च्या स्पॅनिश फ्लूच्या महासाथीमध्ये मृत्यू झाला होता. दक्षिण आफ्रिकेच्या माध्यमांनुसार फ्रेडी हे सर्वाधिक वयाचे व्यक्ती असल्याचे म्हटले. फ्रेडी यांच्या कुटुंबीयाच्यावतीने त्यांचे नातू अँड्रे नाइदू यांनी म्हटले की, त्यांची इच्छाशक्ती चांगली होती. मागील दोन वर्षांपासून त्यांनी डॉक्टरांकडे तपासणीसाठी जाणे थांबवले होते. फ्रेडी यांचा मृत्यू वृद्धपकाळाने झाला असून करोनामुळे झाला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. फ्रेडी यांच्या वयाबाबतचा विक्रम जिनियस बुक ऑफ रेकोर्डमध्ये नोंदवण्यात आला नाही.

Recent Posts