loader
Foto

बेलारूसमुळे नाटो-रशियात तणाव; अमेरिकेने पाठवली अणवस्त्रे डागणारी विमाने

बेलारूसमध्ये एकीकडे नागरिकांचे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे रशिया आणि नाटो दरम्यान तणाव वाढत चालला आहे. रशियाने बेलारूसचे राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशेन्को यांना पाठिंबा दिला आहे. तर, दुसरीकडे नाटो देशांकडून त्यांना विरोध सुरू आहे. जवळपास २६ वर्ष सत्तेवर असलेल्या लुकाशेन्को यांना नाटो देश सत्तेवरून हटवण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे रशिया आणि नाटो देशांमध्येही तणाव वाढत आहे. या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने आता आपली सहा बी-५२ क्षेपणास्त्र डागणारी लढाऊ विमाने पाठवली आहेत.

अमेरिकेच्या हवाई दलाने एक निवदेश प्रसिद्ध केले असून त्यानुसार, सहा बी-५२ बॉम्बर विमाने ही उत्तरी डकोटाच्या मिनोटमधील हवाई तळावरून उड्डाण घेऊन २२ ऑगस्ट रोजी ब्रिटनच्या फेअरफोर्ड हवाई ठिकाणांवर दाखल झाली आहेत. अमेरिकेने सांगितले की, बॉम्बवर्षाव करणारी विमाने युरोप आणि आफ्रिकेमधील विमान प्रशिक्षणातही सहभाग घेतील. अमेरिकेने सांगितले की, २०१८ पासून ही लढाऊ विमाने या ठिकाणी येत आहेत. नाटो मित्र देश आणि अन्य भागिदार देशांसोबत या विमानांची ओळख करून दिली जाते. हे विमान बॉम्बर यंत्रणेला वाढवतील आणि आवश्यक ते प्रशिक्षण देतील. त्याशिवाय पूर्ण जगात कोणत्याही आव्हानांना तोंड देण्यास सज्ज आहेत.

Recent Posts