loader
Foto

बापरे! वाढत्या तापमानामुळे ३० वर्षात २८ ट्रिलयन बर्फ वितळला

करोनाच्या संकटाशी दोन हात करणाऱ्या जगासाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. हवामान बदल, पृथ्वीवरील वाढत्या तापमानाची चिंता व्यक्त केली जात असताना ब्रिटीश शास्त्रज्ञांनी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आणली आहे. वाढत्या तापमानामुळे मागील ३० वर्षात पृथ्वीवप २८ ट्रिलियन टन बर्फ विरघळला असल्याचे समोर आले आहे. एडिनबर्ग विद्यापीठ आणि युनिर्व्हसिटी कॉलेज लंडनमधील संशोधनकर्त्यांनी वर्ष १९९४ ते २००७ दरम्यान उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या सॅटेलाइट फोटोंचा अभ्यास केला. त्यातून ही माहिती समोर आली आहे.

ग्रीन हाउसमध्ये वाढत्या गॅसच्या परिणामाचा अभ्यास करण्यासाठी हे संशोधन करण्यात आले. शास्त्रज्ञांचे संशोधन क्रियोफेअर डिस्कशन जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. या शतकाच्या अखेरपर्यंत समुद्राच्या पातळीत मोठी वाढ होणार आहे. या संशोधनात सहभागी असलेल्या प्रा. एंडी शेफर्ड यांनी सांगितले की समुद्रातील जलस्तरात एक सेंटिमीटरची वाढ झाली तरी सखल भागात राहणारे किमान १० लाख लोक विस्थापित होण्याचा धोका आहे.

शास्त्रज्ञांनी सांगितले की, निम्म्याहून अधिक बर्फ हा उत्तर गोलार्धात वितळला आहे. तर, उर्वरीत दक्षिण गोलार्धा भागातील वितळला आहे. वर्ष १९९० नंतर बर्फ वितळण्याचा दर ५७ टक्क्यांहून अधिक आहे. आता हा दर ०.८ हून अधिक वाढला असून १.२ ट्रिलियन प्रतिवर्ष इतका झाला आहे.

Recent Posts