loader
Foto

रशियानंतर 'या' देशात लस वापराला मंजुरी

करोनाच्या संसर्गाला अटकाव करणाऱ्या लशीवर संशोधन सुरू आहे. काही लशींच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र, रशियानंतर आता चीननेही रुग्णांवरील वापरासाठी लस वापराला मान्यता दिली आहे. चीनमध्ये विकसित करण्यात आलेल्या लशींचा वापर करण्यात येणार आहे. यामध्ये Sinopharm च्या लशीचा समावेश आहे.

चीनच्या करोना वॅक्सीन डेव्हलेपमेंट टास्कफोर्सचे प्रमुख झेंग झॉन्गवी यांनी सीसीटीव्ही वृत्तवाहिनीला सांगितले की, एक महिन्यापूर्वी चीनने आपात्कालीन परिस्थितीत वापरता येणारी लस लाँच केली होती. ही लस देण्यात आलेल्या लोकांना ताप आला नाही. मात्र, इतर काही साइड इफेक्टस जाणवले.

चीनमधील लस प्रतिबंधक कायद्यानुसार, जर कोणतीही आपात्कालीन आरोग्य समस्या निर्माण झाली तर लस चाचणीचा कालावधी मर्यादित करण्यात येतो. जेणेकरून आरोग्य कर्मचारी, कस्टम अधिकारी व इतर आवश्यक अधिकारी, कर्मचाऱ्यांना लस टोचता येऊ शकते. चीनच्या Sinopharm कंपनीने आपल्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी पेरू, मोरक्को आणि अर्जेंटिनासोबत करार केला आहे.

झेंग यांनी सांगितले की, आगामी काळात आजाराला रोखण्यासाठी फूड मार्केट, परिवहन वाहतूक व्यवस्था, सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांपर्यंत लस देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. आपात्कालीन काळात ही लस वापरता येणार आहे. यामध्ये काही हजार, लाख लोकांचाही समावेश असू शकतो. त्याशिवाय अनेकांना मोफत लस देण्यात येत आहे. मात्र, त्यांची संख्या सांगणे अशक्य आहे. चीनच्या लष्करी जवानांनाही लस देण्यात येत आहे. मात्र, त्याची संपूर्ण माहिती समोर आली नाही.

Recent Posts