loader
Foto

पाहा: कॅलिफोर्निया आगीची महाभयंकर दृष्य; हजारोजण बेघर

 

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील जंगलाला लागलेल्या आगीने महाभयंकर रुप धारण केले आहे. जंगलाला लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जात आहेत. मात्र, आगीवर नियंत्रण मिळवण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने हेलिकॉप्टरचीही मदत घेतली. मात्र, आगीच्या उठलेल्या ज्वाळांमुळे हेलिकॉप्टर कोआलिंगाजवळ कोसळले. कॅलिफोर्नियाचे राज्यपाल गॅविन न्यूसम यांनी शंभराहून अधिक आगीच्या घटनांमुळे आणीबाणी जाहीर केली आहे. आगीमुळे सॅन फ्रॅन्सिस्कोमधील पाच हजार नागरिकांना स्थलांतर करावे लागले आहे. या आगीमुळे मोठ्या प्रमाणावर प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. मागील ७२ तासांपासून आग लागली असून हा वणवा अधिकच पसरत आहे. अग्निशमन दलाचे जवान आणि इतर यंत्रणा आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत आहेत.

या आगीचा सर्वात मोठा धोका वॅकवील शहराला आहे. याठिकाणी एक लाखांहून अधिक नागरीक राहतात. हे शहर सॅन फ्रॅन्सिस्को आणि सॅक्रिमेंटो शहरामध्ये आहे. नागरिकांनी घर सोडून इतरत्र आसरा घ्यावा यासाठी अधिकारी घरोघरी जाऊन लोकांना सूचना देत सतर्क करत आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वॅकवीलमध्ये ५० हून अधिक इमारतींना आग लागली आहे. तर, ५० हून अधिक इमारतींना आगीती झळ बसली आहे.

Recent Posts