loader
Foto

युद्ध सरावात रणगाडा बुडाला; चीन लष्कराची नाचक्की!

एकीकडे चीन आशिया खंडातील अनेक भागांवर, विशेषत: दक्षिण चीन समुद्रात आपला हक्क सांगत आहे आणि दुसरीकडे लष्करी सामर्थ्य दाखवत आहे. शेजारच्या देशांवर दबाव वाढवण्यासाठी चीन आपले लष्करी सामर्थ्यांचे प्रदर्शन करत आहे. मात्र, नुकत्याच एका व्हिडिओमुळे चीनची नाचक्की झाली आहे.

तैवानवर आपला हक्क सांगणाऱ्या चीनने तैवान ताब्यात घेऊ अशी धमकीही दिली आहे. तैवानविरोधात लढण्यासाठी चीनचा आपल्या amphibious रणगाड्यावर मोठा विश्वास आहे. हा रणगाडा जमीन आणि पाणी या दोन्ही ठिकाणी धावतो. मात्र, नुकत्याच समोर आलेल्या या व्हिडिओनुसार, हा रणगाडा सरावादरम्यान बुडाला. पाण्याच्या मार्गे तैवानला युद्धात पराभूत करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या चीनला यामुळे धक्का बसला आहे.

चीनचा विश्वास असलेल्या amphibious रणगाडा हा पाण्यात बराच काळ राहू शकतो आणि आवश्यकता भासल्यास हा रणगाडा अचानकपणे हल्ला करू शकतो. त्याशिवाय कोणत्याही संशयितास नदीतून जाण्यास अटकाव करू शकतो. मात्र, amphibious टँक बुडाल्यामुळे त्याच्या गुणवत्तेवर प्रश्न उभे राहिले आहेत. हा रणगाडा हलक्या प्रतीच्या स्टीलपासून बनवण्यात आला असल्याची चर्चा आहे. त्याशिवाय याकामी भ्रष्टाचार झाला असल्याचे म्हटले जात आहे. या एका टँकमुळे आता चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे शस्त्र, उपकरणे याच्या दर्जावर प्रश्न निर्माण होत आहे.

Recent Posts