loader
Foto

करोनाचा नवीन प्रकार; १० पट अधिक वेगाने पसरतोय संसर्ग

क्वालालंपूर: जगभरात करोनाच्या संसर्गाने थैमान घातले असून संसर्गाला अटकाव करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आता चिंता वाढणारे वृ्त्त समोर आले आहे. करोनाच्या संसर्गाचा नवा प्रकार समोर आला आहे. या प्रकारातील विषाणू तब्बल १० पट अधिक वेगाने पसरत असल्याचे समोर आले आहे. या करोनाची सुरुवात मलेशियातील एका रेस्टोरंटच्या मालकापासून सुरू झाल्याचे म्हटले जात आहे. भारतातून पुन्हा मलेशियात गेल्यानंतर या मालकाने १४ दिवसांचा क्वारंटाइनची मुदत पूर्ण केली नाही. जुलै महिन्यात हा बाधित आढळला होता.

भारतीय वंशाच्या या रेस्टोरंट मालकाला आता क्वारंटाइन नियम तोडल्याबद्दल पाच महिन्यांची शिक्षा दंड ठोठावण्यात आला आहे. या नव्या करोनाची बाधा फिलीपाइन्समधून पुन्हा मलेशियात येणाऱ्या एका गटातही झाल्याचे समजते. यातील ४५ जणांपैकी तीन जणांना या नव्या प्रकाराच्या करोनाची लागण झाली आहे. अमेरिकेचे मुख्य आरोग्य सल्लागार डॉ. फौसी यांनी सांगितले की, या करोनाचा प्रसार अधिक वेगाने होण्याची दाट शक्यता आहे.

मलेशियाच्या आरोग्य विभागाचे संचालक जनरल नूर हिशाम अब्दुला यांनी सांगितले की, करोनाच्या नव्या म्यूटेशनचे गंभीर परिणाम समोर येऊ शकतात. त्यामुळे आतापर्यंत लस बनवण्यासाठी घेतलेली मेहनत आणि खर्च वाया जाण्याची शक्यता आहे. नवीन म्युटेशन डी६१४जी या प्रकारातील आहे.

Recent Posts