loader
Foto

लडाख: LAC वरून मागे हटणे दूरच; चिनी सैन्य करतेय 'हे' काम

बीजिंग: लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (LAC)ओलांडून भारताच्या हद्दीत घुसखोरी करणारे चिनी सैन्य अद्यापही मागे हटण्यास तयार नाही. एकीकडे भारतासोबत सुरू असलेला तणाव कमी करण्याचा प्रयत्न करत असलेल्याची टिमकी वाजवणाऱ्या चिनी सैन्याने आता लडाखमधील पँगोग त्सो आणि गोगरा-हॉट स्प्रिंग भागात फायबर ऑप्टिक केबल लाइन टाकण्यास सुरुवात केली आहे.

ओपन इंटेलिजेंस सोर्स detresfa ने भारतीय माध्यमांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार सांगितले की, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने पँगोग त्सो आणि गोगरा-हॉट स्प्रिंग भागात फायबर ऑप्टिकल केबल टाकण्याचे काम सुरू केले आहे. detresfa या भागातील काही सॅटेलाइट छायाचित्रेही समोर आणली आहेत. लडाख आणि अक्साइ चीन भागातील चिनी सैन्याची संख्या कमी झाली असली तरी १५९७ किमी अंतरावर त्यांची सैन्य अद्यापही असून मागे हटलेले नाही. लडाखमध्ये चिनी सैन्याच्या या हालचालींना चीनच्या केंद्रीय सैन्य आयोगाकडून परवानगी मिळाली आहे. हा विभाग राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या अखत्यारीत येतो.

चीनकडून सातत्याने शांतता आणि स्थिरता यावर भाष्य करण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात त्यांची कृती वेगळीच असल्याचेही समोर आले आहे. भारतीय सैन्याने पँगोग त्सोमधील जुने प्रशासनिक तळ हटवण्याची मागणी चीनने केली आहे. इतकंच नव्हे तर, कुगरंगमधील डोंगराळ भागातून भारतीय सैन्याला माघार घेण्यास चीनकडून सांगण्यात आले आहे.

Recent Posts