loader
Foto

India China लडाखजवळ चीनच्या तोफा धडाडल्या; चीनकडून युद्धाची तयारी?

बीजिंग: भारतासोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनच्या हालचालींना वेग आला आहे. चीनने हिमालयात आपल्या नव्या शस्त्रांची चाचणी करणे सुरू केले आहे. चीनने केलेल्या या युद्धसरावात १२२ एमएमच्या वाहनांवर ठेवण्यात येणारी Howitzer आणि HJ-10 अॅण्टी टँक क्षेपणास्त्रांची चाचणी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या तिबेट मिलिट्री भागात मागील महिन्यात केली असल्याचे वृत्त सीसीटीव्ही वृत्तवाहिनीने दिले आहे.

हा युद्धसराव ४६०० मीटर उंचीवर (जवळपास १५ हजार फूटांवर) करण्यात आली. यामध्ये Howitzer चा वापर करण्यात आला. पहिल्यांदाच या भागात चाचणी केली असल्याचे म्हटले जात आहे. यावेळी सहाऐवजी चार चाकी वाहनांवर Howitzer ला ठेवण्यात आले होते. तर, ट्रकवर असलेल्या HJ-10 मध्येही चारऐवजी दोन लाँचर ठेवण्यात आले होते. हिमालयातील डोंगराळ भागात ही शस्त्रे ने-आण करण्यासाठी त्यामध्ये बदल करण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे. गरज भासल्यास या शस्त्रांना हवाई दलामार्फतही पाठवण्यात येऊ शकतात.

डोंगराळ भागात Howitzer चा वापर फायदेशीर ठरू शकतो. Howitzer लांब पल्ल्यावरील प्रोजेक्टाइल फायर करू शकतात. तर, दुसरीकडे HJ-10 १० किमी अंतरावरील मोठ्या ठिकाणांवरही लक्ष्य साधू शकतो. त्याशिवाय लहान नौका, हेलिकॉप्टरवरदेखील निशाणा साधून त्यांना उडवून लावू शकतात. लडाखमध्ये चीनकडून सातत्याने सैन्याची जमावजमव केली जात असून शस्त्रे तैनातही केली असल्याचे वृत्त आहे.

तर, दुसरीकडे दक्षिण चीन समुद्रात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने या भागातही आपले नौदल आणि सैन्य सज्ज ठेवले आहे. मागील काही दिवसांपासून युद्ध सराव करण्यात येत आहे. या सरावाचे काही व्हिडिओ चीन सरकारचे माध्यम ग्लोबल टाइम्सने ट्विट केले आहे. यामध्ये अॅण्टी एअरक्राफ्ट शूटींग ड्रीलही करण्यात आली. त्याशिवाय आपत्कालीन स्थितीत कमी वेळेत सैन्य सज्ज करण्यावरही भर देण्यात येत आहे.

Recent Posts