loader
Foto

Coronavirus vaccine करोना लस: ब्रिटनसोबत आणखी एका भारतीय कंपनीचा करार

लंडन: करोना प्रतिबंधक लस विकसित होत असून काही लशींची अंतिम टप्प्यातील चाचणी सुरू झाली आहे. लस विकसित झाल्यानंतर त्याच्या पुरवठ्याबाबतही आताच नियोजन सुरू झाले आहे. ब्रिटन सरकारने भारतीय कंपनीसोबत करार केला आहे. मुंबईतील फार्मास्युटिकल आणि जैव तंत्रज्ञान कंपनी वॉकहार्टसोबत ब्रिटन सरकारने करार केला आहे.

ब्रिटन सरकारने याची माहिती दिली आहे. या करारानुसार, कोविड-१९ वरील लस तयार झाल्यानंतर कोट्यवधी लशींचा पुरवठा करण्यात येणार आहे. ब्रिटनमध्ये काही लशींची चाचणी अंतिम टप्प्यात आली आहे. यामध्ये ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि AsteraZeneca ही कंपनी संयुक्तरीत्या विकसित करत असलेली लस आघाडीवर आहे.

उद्योग, ऊर्जा आणि औद्योगिक विभागाने म्हटले की, 'फिल अॅण्ड फिनिश'च्या टप्प्याला पूर्ण करण्यासाठी भारतीय कंपनीसोबत १८ महिन्यांचा करार करण्यात आला आहे. यामध्ये तयार करण्यात आलेल्या डोसला काचेच्या कुप्पीत टाकण्याच्या कामाचा समावेश आहे. वॉकहार्टमध्ये विकसित करण्यात येत असलेल्या या लशीला ब्रिटन सरकार आणि लस उत्पादकांना जगभरात मोठ्या प्रमाणावर वितरीत करण्यात सेवा देण्यात येणार आहे.

ब्रिटनचे उद्योग मंत्री आलोक शर्मा यांनी सांगितले की, आज आम्ही कोविड-१९च्या लशीच्या उत्पादनाची अतिरिक्त क्षमता सुरक्षित केली आहे. यामुळे आता लस वितरण करण्याची हमी मिळाली आहे. तयार करण्यात आलेले डोस काचेच्या कुप्पीत भरून त्याला वितरणासाठी सज्ज करण्यात येणाऱ्या प्रक्रियेला 'फिल अॅण्ड फिनीश' असे म्हटले जाते. याचा पहिला टप्पा सप्टेंबरमध्ये सुरू होणार आहे. उत्तर वेल्समध्ये वॉकहार्टची उपकंपनी असलेल्या सी. पी. फार्मास्युटिकलमध्ये हे काम होणार आहे.

Recent Posts