loader
Foto

ban Chinese app चीनच्या दबावासमोर पाकिस्तानची माघार? घेतला 'हा' निर्णय

इस्लामाबाद: पाकिस्तान सरकारने चीनच्या दबावासमोर माघार घेतली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पाकिस्तान सरकारने ऑनलाइन मल्टिप्लेअर गेम पब्जीवर लावलेली बंदी हटवली आहे. पाकिस्तान दूरसंचार प्राधिकरणने (पीटीए) ही बंदी हटवण्याचा निर्णय घेतला आहे. १७ जुलै रोजी पाकिस्तान सरकारने हा पब्जी इस्लामविरोधी असल्याचे सांगत बंदी घातली होती.

पब्जीची पॅरेंट कंपनी प्रॉक्सिमा बीटाच्या (पीबी) प्रतिनिधींनी गेमिंग प्लॅटफॉर्मचा दुरुपयोग रोखण्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांची माहिती पाकिस्तान सरकारच्या दूरसंचार नियामक प्राधिकरणाला दिली. त्यानंतर कंपनीच्या खुलाश्यावर आणि उचललेल्या पावलावर समाधान व्यक्त करत पब्जीवरील बंदी हटवण्याचा आदेश काढण्यात आला.

पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन ऑथिरीटने पब्जीवर बंदी आणताना पाकिस्तानमधील तरुणांवर मानसिक परिणाम होत असल्याचे कारण देण्यात आले होते. गेममुळे मानसिक तणाव निर्माण झाल्यामुळे तरुणांमधील आत्महत्येचे प्रमाण वाढले असल्याचा दावा करण्यात आला. त्याशिवाय, इस्लामाबाद हायकोर्टातील सुनावणी दरम्यान, पब्जी गेममधील काही दृष्ये ही इस्लामविरोधी आहेत. या दृष्यांना पाकिस्तानमध्ये परवानगी देता येत नसल्याचे सरकारच्यावतीने सांगण्यात आले.

पाकिस्तानमध्ये पब्जी बंद केल्यामुळे पंतप्रधान इम्रान खान यांच्या तहरीक-ए-इसांफ या पक्षाला निवडणुकीत नुकसान होण्याची भीती होती. पक्षाच्या दबावात येऊन पाकिस्तान सरकारने हा बंदीचा निर्णय मागे घेतला असल्याची चर्चा आहे. पाकिस्तानच्या तरुणांमध्येही पब्जी लोकप्रिय आहे. त्यामुळे या बंदीमुळे तरुण मतदार पक्षापासून दुरावण्याची भीती व्यक्त केली जात होती.
 

Recent Posts