loader
Foto

कोण म्हणतो भारत गरीब देश आहे?; अमेरिकेच्या सिनेटमध्ये खडाजंगी

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्लोबल वार्मिंगच्या मुद्यावर भारत, चीनवर टीका केल्यानंतर आता अमेरिकन सिनेटरनेही भारत-चीनवर टीका केली आहे. भारत आणि चीन या दोन्ही देशांनी मागील दोन दशकात मोठी झेप घेतली असून हे देश श्रीमंत झाले आहेत. मात्र, या दोन्ही देशांची नवीन जबाबदारी घेण्याची तयारी नसल्याचे अमेरिकन सिनेटर चक ग्रास्सले यांनी म्हटले.

अमेरिकन सिनेटर ग्रास्सले हे अर्थ समितीचे अध्यक्ष आहे. त्यामुळे त्यांच्य वक्तव्य मोठे समजले जात आहे. जागतिक व्यापार संघटनेवर अमेरिकन काँग्रेसमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी ही टिप्पणी केली. त्यांनी म्हटले की, मागील दोन दशकात चीन आणि भारतासारखे देश अधिकच श्रीमंत झाले आहेत. मात्र, त्यांनी नवीन जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे. अशा वेळेस राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून हा असमतोल दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जागतिक व्यापार संघटनेला अधिक तार्किकपणे निर्णय घेण्यास भाग पाडण्याच्या ट्रम्प यांच्या प्रयत्नाचे कौतुक करावे लागतील असेही त्यांनी सांगितले.

भारत आणि चीन या दोन देशांनी स्वत:ला विकसनशील देश असल्याचा दावा करत विशेष सवलत, व्यवहार करावा अशी अपेक्षा बाळगतात. या दोन्ही देशांना कॅमेरून सारख्या देशाला मिळणाऱ्या सवलती, सुविधा हव्या असल्याची टीका त्यांनी केली.

 

दरम्यान, ग्लोबल वार्मिंगच्या मुद्यावर ट्रम्प यांनी रशिया, चीनसह भारतावर टीका केली आहे. भारत, चीन आणि रशिया हे तिन्ही देश हवेच्या गुणवत्तेकडे लक्ष देत नसल्याचा आरोप त्यांनी केला. ट्रम्प यांनी पॅरिस करारावरही टीका करत अमेरिकेने यातून बाहेर पडण्याचे समर्थन केले.

ट्रम्प यांनी म्हटले की, पॅरिस करारावर अंमल केला असता तर अमेरिका हा स्पर्धक देश राहिला नसता. अमेरिकेच्या विकासावर याचा परिणाम झाला असता. अनेक अमेरिकन नागरिकांच्या नोकऱ्या, उद्योग, कारखाने हे चीनमध्ये अथवा इतर देशांमध्ये गेले असते. अमेरिकेने आपल्या हवेच्या दर्जाकडे लक्ष द्यावे. मात्र, स्वत:च्या देशातील हवेच्या दर्जाकडे चीन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. भारतानेही आपल्या देशातील हवेच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष केले आहे. रशियाही याच मार्गावरून चालत असून फक्त अमेरिकाच आपल्या देशातील हवेच्या गुणवत्तेकडे लक्ष देत असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला

Recent Posts