loader
Foto

शत्रूवर जरब बसणार! भारतात दाखल होण्यासाठी फ्रान्समधून आज उड्डाण घेणार राफेल

पॅरिस: अत्याधुनिक क्षेपणास्त्र आणि घातक बॉम्बनी सुसज्ज असलेले लढाऊ विमान राफेल आज फ्रान्समधून भारतासाठी उड्डाण घेणार आहे. चीन आणि पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या राफेलचे भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात येणे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट समजली जात आहे. राफेलने भारतासाठी उड्डाण घेण्यापूर्वी फ्रान्समधील भारतीय दूतावासाने राफेलची आणि भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांचे छायाचित्र ट्विट केले आहे.

राफेलची विमाने दोन दिवसांच्या प्रवासानंतर २९ जुलै रोजी अंबाला येथील हवाई दलाच्या तळावर दाखल होतील सूत्रांच्या माहितीनुसार, आज फ्रान्समधील पाच किंवा सहा लढाऊ विमाने भारताकडे रवाना होणार आहेत. भारतात दाखल झाल्यानंतर या विमानांना एका आठवड्यातच ही लढाऊ विमाने कोणत्याही मोहिमेसाठी सुसज्ज करण्यात येणार आहे. राफेलच्या उड्डाणासाठी भारतीय हवाई दलाच्या १२ वैमानिकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
जगातील सर्वात प्राणघातक क्षेपणास्त्रे आणि सेमी-स्लॅथ तंत्रज्ञानाने सज्ज असणाऱ्या राफेलच्या समावेशामुळे भारतीय हवाई दलाच्या ताकदीत वाढ होणार आहे.
राफेल लढाऊ विमानांमध्ये जगातील सर्वात आधुनिक हवेतून हवेत मारा करणारी मीटिआर क्षेपणास्त्रेदेखील असणार आहेत.

 

अबूधाबी विमानतळावर विश्रांती
फ्रान्समधून उड्डाण घेतल्यानंतर राफेल विमानांचा प्रवास निश्चित करण्यात आला आहे. अनेक देशांच्या सीमा ओलांडून राफेल भारतात प्रवेश करणार आहे. फ्रान्स ते भारतापर्यंतचा प्रवास पूर्ण करण्यासाठी राफेल जवळपास १००० किमी प्रतितास इतक्या वेगाने उड्डाण करणार आहे. राफेलचा सर्वाधिक वेग हा २२२२ किमी प्रति तास इतका आहे.

राफेल जेट्स अबूधाबी येथील अल धाफरा येथील हवाई तळावर उतरतील. सुमारे दहा तासाच्या या प्रवासात दोन विमाने त्यांच्याबरोबर हवेत इंधन भरण्यासाठी येणार आहेत. रात्रभर अबूधाबीमध्ये थांबल्यानंतर राफेल भारताकडे येण्यासाठी उड्डाण घेतील.या प्रवासादरम्यान दोनदा विमानात इंधन हवेतून भरले जाईल. राफेलच्या पायलट्सना हवेत असताना इंधन भरण्याचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे.

Recent Posts