loader
Foto

धक्कादायक! मित्रांचा आग्रह भोवला, उपाशी पोटी दारू प्यायल्याने तरुणीचा मृत्यू

लंडन: मित्रांसोबत पार्टी म्हटली की अनेकजण मद्यपान करतात. जे मद्यपान करत नाहीत अशा मित्र-मैत्रिणींना देखील आग्रह केला जातो. दारू पिण्याचा आग्रह एका तरुणीच्या प्राणावर बेतला. उपाशी पोटी दारू प्यायल्या मुळे २७ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. इंग्लंडमधील ब्राइटन शहरात ही घटना घडली. विशेष म्हणजे मृत्यू झालेली तरुणी आपल्या फिटनेसबाबत अधिक सजग होती.

अॅलिस बर्टन ब्रॅडफोर्ड असे या दुर्देवी तरुणीचे नाव आहे. मेट्रो युकेने दिलेल्या वृत्तानुसार, उपाशी पोटी दारू प्यायल्यामुळे मृत्यू होणे ही दुर्मिळ बाब आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅलिसला अल्कोहोलिक किटोएसिडोसिस नावाचा आजार होता. हा आजार अतिशय दुर्मिळ असल्याचे बोलले जाते. कदाचित या आजाराबाबत तिलाही माहिती नसणार, असे डॉक्टरांनी सांगितले. हा आजार मेटाबॉलिझमशी निगडीत असून उपाशी पोटी दारू पिणे हे विष प्राशन करण्यापेक्षाही धोकादायक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अॅलिससोबतही अशाच प्रकारे घटना घडली असण्याची शक्यता आहे. अॅलिसला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

 

अॅलिसच्या मित्रांनी सांगितले की, अॅलिस कधीही मद्यसेवन करायची नाही. अॅलिस एक सायकलपटू आणि धावपटू होती. त्यामुळे आपल्या फिटनेसबाबत ती अधिकच सजग होती. अॅलिसला तिच्या मित्र मैत्रिणींनी दारू पिण्याचा आग्रह केला. अॅलिसने काही घोटच दारूचे सेवन केले आणि त्यानंतर काही वेळेतच तिच्या पोटात दुखू लागले. तिची प्रकृती अचानक ढासळू लागल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्याआधीच तिने प्राण सोडले होते.

ब्रिटनमध्ये याआधीदेखील अशीच एक घटना समोर आली होती. एका ३० वर्षीय अॅरोन मलवे या युवकानेही उपाशी पोटी दारू प्यायली होती. त्याचाही काही वेळेतच मृत्यू झाला.

Recent Posts