loader
Foto

भारताच्या क्रिकेटपटूला यायची थेट पाकिस्तानमधून पत्र, वाचा पूर्ण गोष्ट...

भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक शत्रू आहेत. पण या दोन्ही देशांमधील क्रिकेटच्या सामन्यांना मात्र तुफान गर्दी होते. या दोन्ही देशांतील सामना म्हणजे मैदानावरेच युद्धच. दोन्ही देशांच्या सामन्या खेळाडू आपला जीव ओतून कामगिरी करत असतात. पण भारताच्या एका क्रिकेटपटूला तर थेट पाकिस्तानमधून पत्र यायची, असा खुलासा या क्रिकेटपटूनेच आज केला आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची उत्सुकता क्रिकेट विश्वाला असते. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांमध्ये प्रचंड दडपण खेळाडूंवर असते. कधी मैदानात खेळाडूंचे वाद विवादही होतात. पण मैदानातील खेळाचा बाहेरच्या आयुष्यात संबंध ठेवायचा नसतो, असे म्हटले जाते. पण भारताच्या क्रिकेटपटूबाबत मात्र असे घडताना दिसले नाही. कारण भारताच्या एका क्रिकेटपटूला थेट पाकिस्तानमधून पत्र यायची, ही बाबा आता समोर आली आहे.

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत तणावाचे संबंध आहेत. पण या दोन्ही देशांतील लोकांमध्ये मात्र जास्त तणाव पाहायला मिळत नाही. कारण दोन्ही देशांतील लोकं एकमेकांचा आदर करत असल्याचे काही वेळा पाहायला मिळते, तशीच एक गोष्ट भारताच्या क्रिकेटपटूबाबतही घडल्याचे पाहायला मिळत आहे. कारण या क्रिकेटपटूला पत्र एक पाकिस्तानचा क्रिकेटपटूच पोहोचवायचा, असेही आता समोर आले आहे.

नेमके प्रकरण आहे तरी काय...
भारताच्या एका क्रिकेटपटूने १९९१ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तो क्रिकेटपटू हा बऱ्याच जणांसाठी आपला आवडता खेळाडू बनला होता. पाकिस्तान हे काही जण शत्रू राष्ट्र समजत असले तरी तिथे या खेळाडूचा एक कट्टर चाहता होता. त्यावेळी फोन सहसा कोणाकडे नसायचे. त्यामुळे तो पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त करायचा.

हा क्रिकेटपटू आहे तरी कोण...
भारताच्या कोणत्या क्रिकेटपटूचे पाकिस्तानमध्ये अजूनही चाहते आहे, याची उत्सुकता तुम्हाला असेल. तर हा खेळाडू आहे माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा बालमित्र आणि भारताचा माजी फलंदाज विनोद कांबळी.

Recent Posts