loader
Foto

Explained : इराणला गमावणं भारतासाठी धोक्याचं का आहे?

इराणने चाबहार-जाहिदान रेल्वे प्रकल्पातून भारताला वगळल्यानंतर जगभरातील माध्यमांमध्ये हा भारताला सर्वात मोठा झटका असल्याची बातमी झळकली. त्याचं कारणही तसंच आहे. इराण हा देश भारताचा पारंपरिक मित्र राहिलेला आहे. भौगोलिकदृष्ट्या बाजूला पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि मध्य आशियात जाण्याचा मार्ग असलेला इराण भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. भविष्यात भारत या प्रकल्पाचा हिस्सा होऊ शकतो असं परराष्ट्र मंत्रालयने स्पष्ट केलं असलं तरी परिस्थिती वेगळी आहे. भारताचा शत्रू बनलेल्या चीनने इराणला आर्थिक बळ दिलं आणि इराणसारखा मित्रही भारताच्या हातून निसटला. अमेरिकेच्या निर्बंधाच्या भीतीने भारताने चाबहार बंदराकडेही दुर्लक्ष केलं. परिणामी चीनने आता इराणमध्ये पाय रोवण्यास सुरुवात केली आहे.

भारताला एक नवा झटका
भारताने यापूर्वीच अमेरिकेच्या निर्बंधाच्या भीतीने इराणकडून अत्यंत कमी खर्चात होणारी तेल आयात थांबवली होती. आता गॅस क्षेत्रातही भारताची चिंता वाढली आहे. आपण स्वतःच्या बळावरच इराण गॅस फिल्ड विकसित करणार असल्याचं इराणने स्पष्ट केलं. करारानुसार भारतीय सरकारी कंपनी ओएनजीसी या प्रकल्पाचा हिस्सा होती. पण नंतर इराणने भूमिका बदलल्याने या करारावर परिणाम झाला आहे. दरम्यान, काही काळानंतर भारतासाठी या प्रकल्पाचे दरवाजे खुले असल्याचंही इराणने म्हटलं आहे. इराणचं नैसर्गिक गॅस क्षेत्र २००८ मध्ये खुलं करण्यात आलं होतं, ज्यासाठी भारताकडूनही हक्क मिळवण्याचा प्रयत्न सुरू होता. पण अमेरिकेकडून मिळालेल्या निर्बंधांच्या इशाऱ्यानंतर भारताचं नियोजन बिघडलं.

चाबहार बंदराचं महत्त्व, रेल्वे प्रकल्प आणि भारताला तोटा
भारतासाठी चाबहार बंदर हे एक अत्यंत महत्त्वाचं डेस्टिनेशन म्हणून पुढे येणार होतं. मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात यावर मोठ्या प्रमाणात भर दिला आणि चाबहार बंदराचा विकास केला. यावर्षीच्या अर्थसंकल्पात चाबहार बंदराच्या विकासासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचीही माहिती आहे. पण अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढला आणि भारतावर निर्बंधांची टांगली तलवार होती. दरम्यान, अमेरिकेने भारताची गरज लक्षात घेत चाबहार बंदरातून सूट दिली होती.
 

Recent Posts