loader
Foto

अमेरिका: सॅन डिएगोमध्ये युद्धनौकेला आग; २१ जखमी

लॉस एंजलिस: कॅलिफोर्नियातील अमेरिकन नौदल तळ सॅन डिएगोमध्ये अमेरिकेच्या एका युद्धनौकेला आग लागल्याची घटना घडली. या आगीत १७ नाविकांसह २१ जण जखमी झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. जवळच्या रुग्णालयात जखमींवर उपचार करण्यात येत आहे.

'युएसएस बोनोम्मे रिचर्ड'वरील खलाशांना आगीमुळे किरकोळ जखमा झाल्या असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले असल्याचे वृत्त सीएनएनने दिले आहे. पूर्ण क्रू जहाजातून बाहेर काढण्यात आला असून सर्वजण सुखरूप असल्याची माहिती नेव्हल सर्फेस फोर्सने ट्विट करून दिली आहे. ही आग स्थानिक वेळेनुसार, सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास लागली असल्याची माहिती समोर आली आहे. आग लागली तेव्हा जहाजावर १६० जणा होती. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. स्थानिकांनी काही स्फोटांचे आवाज ऐकले असल्याचे स्थानिक वृत्तमाध्यामांनी म्हटले आहे.

आग लागल्याची घटना समजताच तातडीने घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. जहाजावरील आगीवर नियंत्रण मिळण्याचे प्रयत्न करण्यात आले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आग लागल्यानंतर इतर जहाजांना इतरत्र नेण्यात आले.

Recent Posts