loader
Foto

Coronavirus करोना उगमाची चौकशी; चीनमध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे पथक दाखल

बीजिंग: करोना विषाणूची निर्मिती चीनमध्ये झाली का, चीनमधूनच याचा प्रसार झाला का, आदी मुद्यांबाबत चौकशी करण्यासाठी आता जागतिक आरोग्य संघटनेचे एक पथक चीनमध्ये दाखल झाले आहे. दोन सदस्यीय पथक दोन दिवस चीनमध्ये असणार असून आगामी व्यापक चौकशीसाठीची पूर्वतयारी करणार आहे.

मागील सहा महिन्यांपासून जगभरात हाहाकार माजवणाऱ्या करोनाच्या संसर्गासाठी चीन जबाबदार असल्याचा आरोप अमेरिकेने सातत्याने केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने चीनला पाठिशी घातल्याचा आरोप करण्यात येत होता. जागतिक आरोग्य संघटनेच्या या पथकात दोन तज्ञांचा समावेश आहे. यामध्ये प्राणी तज्ञ आणि दुसरे साथरोग तज्ञ आहेत. भविष्यकालीन योजनांसाठी प्राण्यांमधून माणसांमध्ये विषाणूंचा संसर्ग कसा होतो, याबाबतही हे पथक माहिती करून घेणार आहे. करोनाचा विषाणू वटवाघळांच्या माध्यमातून माणसांमध्ये फैलावला असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा आहे. त्यानंतर खवले मांजर अथवा इतर सस्तन प्राण्यांच्या माध्यमातून विषाणूचा संसर्ग झाला असण्याची शक्यता आहे.

करोनाचा पहिला रुग्ण डिसेंबर २०१९ मध्ये चीनमधील वुहानमध्ये आढळला होता. त्यानंतर जगभरातील जवळपास २०० देशांमध्ये करोनाचा संसर्ग पसरला आहे. करोना संसर्गाच्या मुद्यावर अमेरिकेने सातत्याने चीनवर निशाणा साधला होता. जगभरात चीनभोवती संशयाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर चीनने करोनाबाबतची चौकशी करू देण्यास सशर्त परवानगी दिली.

चीनने करोना संसर्गाची माहिती जगापासून लपवली असल्याचा आरोप अमेरिकेने केला होता. चीनला जागतिक आरोग्य संघटनेने पाठीशी घातल्याचा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सातत्याने केला आहे. अमेरिकेचे आरोप जागतिक आरोग्य संघटनेने सातत्याने फेटाळून लावले आहेत. अमेरिकने करोनाच्या संसर्गाला चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेला जवाबदार ठरवले होते. चीनच्या इशाऱ्यावरूनच जागतिक आरोग्य संघटनेने करोनाबाबतची माहिती वेळेवर दिली नसल्याचा आरोप केला होता. जागतिक आरोग्य संघटना चीनच्या हातातील बाहुले झाले असल्याचेही अमेरिकेने म्हटले होते. चीनला झुकतं माप दिले जात असल्याच्या मुद्यावरून अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्यत्व सोडले .

Recent Posts