loader
Foto

करोनामुळे झालेले नुकसान काही देशाच्या जीडीपीपेक्षाही अधिक!

सिडनी: जवळपास मागील सहा महिन्यांपासून करोनाच्या संसर्गाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. जगभरातील २०० देशांमध्ये करोनाचा संसर्ग पसरला आहे. करोनाच्या संसर्गामुळे जगाच्या अर्थचक्रावर परिणाम झाले असून मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आतापर्यंत जवळपास ३.८ ट्रिलियन डॉलर खर्च करण्यात आला असल्याचे समोर आले आहे. जर्मनीच्या जीडीपी एवढे नुकसान करोनामुळे झाले आहे. हा आकडा आणखी वाढणार असल्याचाही भीती व्यक्त करण्यात येत आहे.

नुकसान झाले, याबाबत संशोधन करण्यात आले. करोना संसर्गाच्या महासाथीच्या आजारामुळे सर्वाधिक नुकसान पर्यटन क्षेत्राचे झाले आहे. करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या नियंत्रणासाठी अनेक देशांनी विमान वाहतुकीवर बंदी घातली. त्याशिवाय आशिया, युरोप आणि अमेरिकेने पर्यटकांना आपल्या देशात येण्यास मज्जाव केला होता. जगभरात विमान उड्डाण रद्द केल्यामुळे आर्थिक संकट निर्माण झाले असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. विमान वाहतूक बंदीमुळे पर्यटन, व्यापार, ऊर्जा आणि आर्थिक क्षेत्राला मोठा फटका बसला असल्याचे समोर आले आहे.
 

करोनाच्या संसर्गामुळे जगाचे आणखी नुकसान होणार असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. करोनाच्या नियंत्रणासाठी लॉकडाउन अजूनही सुरू आहे. मात्र, लॉकडाउनला हटवल्यास तर त्याचे दूरगामी आणि आर्थिक दुष्परिणाम जाणवणार असल्याचे त्यांनी म्हटले. करोनाच्या संसर्गाचे आर्थिक संकट निर्माण होत असताना दुसऱ्या बाजूला ग्रीन हाउस उत्सर्जनात घट झाली असल्याचेही संशोधकांनी म्हटले आहे. करोनामुळे जगभरात १४ कोटी ७० लाख जणांना रोजगार गमवावा लागला आहे. अनेक देशांतील व्यवहार, अर्थचक्र करोनामुळे ठप्प झाल्यामुळे त्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होत आहे.

'कोविड-१९' ने बाधित असलेल्या नागरिकांची संख्या एक कोटीहून अधिक झाली असून पाच लाखांहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. करोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला असून बाधितांची संख्या २८ लाखांच्या घरात गेली आहे. तर, ब्राझीलमध्ये १७ लाख बाधितांची नोंद करण्यात आली आहे.

Recent Posts