loader
Foto

Coronavirus करोनाबाधितांवर उपचार; WHOकडून या औषधांच्या चाचणीवर बंदी

जिनिव्हा: जागतिक आरोग्य संघटनेने करोनाबाधितांवर उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन, लोपिनवीर आणि रिपोटनवीर या औषधांचे एकत्रित डोस देण्यास बंदी घातली आहे. या औषधांच्या वापरामुळे मृत्यूदरात घट होत नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

या औषधांच्या चाचणीवर देखरेख ठेवणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या शिफारसीनंतर औषधांच्या वापरावर बंदी आणण्याचा निर्णय झाला असल्याची वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे. अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ हेल्थने करोनाबाधितांच्या उपचारासाठी मलेरियाचे औषध हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन किती प्रभाव पाडू शकतो, याचा अभ्यास करण्यासाठी सुरू असलेल्या चाचणीवर बंदी घालण्यात आली होती. रुग्णालयात दाखल असलेल्या करोनाबाधितांच्या उपचारासाठी हे औषध फार उपयोद अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्यावतीने सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वीच ब्रिटनच्या चिकित्सा नियामक संस्थेने करोनाबाधितांच्या उपचारासाठी हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीनची चाचणी करण्यास मंजुरी दिली होती. करोनापासून आरोग्य कर्मचाऱ्यांचा बचाव होतो का, हेदेखील चाचणीत पाहिले जाणार आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषध करोनाबाधितांवर उपचारासाठी योग्य असल्याचा दावा केला होता. त्यानंतर या औषधाची चर्चा सुरू झाली. हृदयरोग असलेल्या करोनाबाधितांना हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधामुळे धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा अमेरिकेतील हृदयरोग तज्ञांनी दिला होता. मागील काही महिन्यांपासून हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाच्या परिणामाबाबत बऱ्याच चर्चा सुरू आहेत.

वैद्यकीय क्षेत्रातील एका नियतकालिकेने हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधामुळे मृतांची संख्या वाढली असल्याचा दावा एका संशोधनाच्या आधारे केला होता. मात्र, काही दिवसांनी हे संशोधन मागे घेण्यात आले. तर, चीनमध्ये नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार, मलेरियाविरोधी औषधामुळे करोनाच्या आजारामुळे गंभीर आजारी असलेल्या रुग्णांमधील मृतांची संख्या कमी झाली आहे. अद्याप हे संशोधन क्लिनिकल विश्लेषणाच्या आधारे करण्यात आले आहे. या संशोधनाची समिक्षा होणे अद्याप बाकी आहे.

दरम्यान, करोनाच्या संसर्गावर मात करण्यासाठी जगभरातील अनेक देशांमध्ये लस विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. करोनाला अटकाव करणारी लस विकसित झाल्यास करोनावर मात करणे शक्य होईल असा कयास लावला जात आहे. मात्र, शास्त्रज्ञांनी या लसीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.करोना प्रतिकारक चाचण्यांची, विशेषत: प्रयोगशाळेबाहेर थेट रुग्णांवर केलेल्या चाचण्यांची अचूकता तपासण्यासाठी पुरावे अपुरे आणि कमकुवत असल्याचे यासंबंधीच्या अभ्यासांचा आढावा घेतल्यानंतर समोर आले आहे. परिणामी, या पुराव्यांवरून प्रतिकारक चाचण्यांचा वापर सुरू ठेवण्यास पुष्टी मिळत नाही, असा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला आहे.

Recent Posts