loader
Foto

Chinese apps banned केंद्र सरकारची चिनी अॅप्सवर बंदी; चीनचा थयथयाट सुरू !

 

बीजिंग: लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत-चीनमध्ये तणाव निर्माण झाला आहे. भारताच्या हद्दीत घुसखोरी करणाऱ्या चीनवर दबाव वाढवण्यासाठी भारत सरकारने टिकटॉकसह ५९ चिनी अॅपवर बंदी घातली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे पडसाद चीनमध्येही उमटले आहेत. चीनच्या सरकारी माध्यमांनी भारत सरकारच्या या निर्णयाविरोधात थयथयाट सुरू केला आहे. भारताचा हा निर्णय म्हणजे अमेरिकन सरकारची नक्कल करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बंदी घातलेल्या अॅप्सविरोधात अनेक तक्ररी येत होत्या. हे अॅप्स देशाचे सार्वभौमत्व, सुरक्ष आणि अखंडतेसाठी घातक बनत चालले होते. चीन या अॅप्सद्वारे भारतीयांच्या डेटाशी छेडछाड करू शकत होता, त्यामुळे केंद्र सरकारने या अॅप्सवर बंदी घातली आहे. त्यानंतर चीनमधील माध्यमांमध्ये या निर्णयाचे पडसाद उमटले आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने म्हटले की, भारताने घेतलेला हा निर्णय म्हणजे अमेरिकेच्याजवळ जाण्याचा प्रयत्न असल्याचे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे. अमेरिकेनेदेखील राष्ट्रवादाच्या आडून चिनी वस्तूंवर बंदी आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या निर्णयामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार असल्याचे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे.

Recent Posts