loader
Foto

Coronavirus vaccine करोनाला अटकाव; लसीची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू!

बीजिंग: चिनी संशोधकांनी करोना विषाणूवरील लशीची दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी सुरू केली आहे. 'चायनिज अॅकेडमी ऑफ मेडिकल सायन्सेस'मधील इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल बायोलॉजीने रविवारी ही माहिती दिली. या चाचणीदरम्यान लशीचे प्रभावीपण आणि सुरक्षितता तपासली जाणार आहे.

करोना विषाणूची साथ वेगाने फैलावत असून, जग नव्या व धोकादायक टप्प्यात असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. त्याच वेळी जगभरात विविध ठिकाणी करोना विषाणूवरील लशीच्या मानवी चाचण्या विविध टप्प्यांवर होत आहेत. मात्र, लशीची कोणतीही चाचणी व्यापक प्रमाणापर्यंत पोहोचलेली नाही.

चीनमधील संशोधकांनी शनिवारी लशीची दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी सुरू केली. सहा संभाव्य लशींची चाचणी चिनी संशोधक मानवावर घेत आहेत. यापूर्वी मेपासून पहिल्या टप्प्यात २०० जणांवर चाचणी घेण्यात आली आहे, असे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल बायोलॉजीने रविवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले. दुसऱ्या टप्प्यातील चाचणीमध्ये लशीचा डोस निश्चित केला जाईल, तसेच संभाव्य लस निरोगी व्यक्तीच्या शरीरात सुरक्षितपणे प्रतिकारशक्ती वाढवते का, हे पाहिले जाईल.

 

दरम्यान, चीनच्या वुहान प्रांतातून जगभरात संक्रमित झालेल्या करोना विषाणूचा येथील संसर्ग आटोक्यात आला असला तरी येथे नव्याने करोनारुग्ण आढळू लागल्याने चिंता व्यक्त होत आहे. ३२ नवे करोनारुग्ण आढळल्याची माहिती चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने रविवारी दिली. यातील २२ रुग्ण हे राजधानी बीजिंग येथील आहेत, तर त्याच्या शेजारील हेबेई प्रांतात ३ रुग्ण आढळल्याचे आयोगाने सांगितले. चीनमध्ये शनिवारी २२ करोनारुग्ण दिसून आले होते. चीनमधील करोनाचा संसर्ग कमालीचा घटला असला तरीही खबरदारीचा उपाय म्हणून बीजिंगसह अनेक ठिकाणी लाखो नागरिकांच्या कोविड चाचण्या केल्या जात आहेत. यानुसार ११ ते २० जून या कालावधीत बीजिंगमध्ये एकूण २२७ करोनाबाधित रुग्ण आढळले. बीजिंगच्या शिनफादी सीफूड मार्केटमध्ये ३० मे ते १२ जून या कालावधीत न फिरकणाऱ्या नागरिकांना करोना संसर्गाचा धोका नसल्याचे दिसून आले आहे.

शीतपेये व खाद्यपदार्थ उत्पादनात आघाडीवर असणाऱ्या पेप्सिको कंपनीला करोना संसर्गामुळे फटका बसला आहे. या कंपनीच्या बीजिंगमधील उत्पादन केंद्रातील काही कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्यानंतर ते केंद्र बंद करण्याचा निर्णय या कंपनीने घेतला, असे वृत्त 'पीपल्स डेली'ने दिले आहे.

सिंगापूरमध्ये २६२ रुग्ण
सिंगापूर : सिंगापूरमध्ये रविवारी २६२ करोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे सिंगापूरमधील करोनाबाधितांची संख्या ४२,०९५ इतकी झाली आहे. चाचण्याची संख्या वाढवण्यात आली असून, करोना संसर्ग झालेले परदेशी कामगार आढळून आले आहेत. स्थानिक पातळीवरील संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या घटली आहे, असे सिंगापूरच्या

Recent Posts