loader
Foto

भारतीय जवानांनीच चीनवर हल्ला केला; चीनच्या उलट्या बोंबा

बीजिंग: भारतीय जवानांचे प्राण घेणाऱ्या चीनने भारताविरोधात बोंबा मारण्यास सुरुवात केली आहे. भारतीय सैन्यानेच चीनच्या सैनिकांवर हल्ला केला. त्याच्या प्रत्युत्तरात भारतीय जवानांना प्राण गमवावे लागले असल्याचे चीनने म्हटले आहे. सीमावाद हा चर्चेतूनच सोडवण्यात येणार असल्याची भूमिका चीनने मांडली आहे.

मागील महिन्यापासून लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला आहे. चिनी सैन्याने भारताच्या हद्दीत घुसखोरी केल्यानंतर दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने उभे ठाकले होते. तणाव निवळण्यासाठी दोन्ही देशांतील लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू होती. मात्र, सोमवारी दोन्ही बाजूने सैन्यांमध्ये चकमक घडली असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. भारताने पहिला हल्ला केल्यानंतर चीनने त्याला प्रत्युत्तर दिले आहे. या चकमकीत दोन्ही बाजूंचे जवान जखमी झाले असल्याचे चीनने म्हटले आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, भारतीय सैनिकांनी दोन वेळेस सीमा ओलांडून चिनी सैनिकांना उकसवण्याचा प्रयत्न केला. भारतीय जवानांची ही कृती दोन्ही देशांमध्ये झालेल्या सहमतीविरोधात आहे. दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये शारिरीक संघर्ष झाला. भारताने आपल्या जवानांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असून त्यांच्या या कृतीमुळे सीमा प्रश्न आणखी जटील होऊ शकतो असेही चीनने म्हटले आहे. चीनचे किती सैन्य मारले गेले याबाबत चीनकडून अधिकृत माहिती समोर आली नाही. सीमेवर झालेल्या या चकमकीनंतर परिस्थिती हाताळण्यासाठी चीनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकी सुरू झाले असल्याचे समजते.

Recent Posts