loader
Foto

हिंदी महासागरात चिनी ड्रॅगन; भारताची चिंता वाढली

 

बीजिंग: भारत आणि चीन दरम्यान लडाखमधील सीमा प्रश्नावर तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशांमधील तणाव निवळण्यासाठी चर्चा सुरू झाल्या आहेत. तर, दुसरीकडे भारताची चिंता वाढणार असल्याचा इशारा तज्ञांनी दिला आहे. हिंदी महासागरात चिनी नौदलाकडून भारताला घेरण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे भारताला लडाखपेक्षाही मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो.

'थिंक टँक ऑब्जर्वर रिसर्च फाउंडेशन'च्या रिपोर्टनुसार, भारतासाठी फक्त लडाख हा चिंतेचा विषय नाही. हिंदी महासागरात चीन वेगाने आपले हातपाय पसरवत आहे. या वर्षी मे महिन्यात घेतलेल्या सॅटेलाइट फोटोवरून चीनच्या हालचाली स्पष्ट झाल्या आहेत. आफ्रिकेतील जिबूती येथील आपला नौदल तळाचा चीनने विकास केला असून त्याला अत्याधुनिक केला आहे. याआधी फक्त लॉजिस्टिक सपोर्टसाठी बनवण्यात आलेल्या ठिकाणाला आता नौदल तळात रुपांतर करण्यात आले आहे. याठिकाणी आता चीनची युद्धवाहू नौकादेखील उभी राहू शकते.

Recent Posts