loader
Foto

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा धसका; बीजिंगमध्ये पुन्हा लॉकडाउन

बीजिंग: जवळपास दोन महिन्यानंतर बीजिंगमध्ये करोनाचे रुग्ण आढळल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतरही काही भागात करोनाचे नवीन रुग्ण आढळत असल्यामुळे अखेर प्रशासनाने बीजिंगमधील काही भागांमध्ये लॉकडाउन जाहीर केला आहे. वुहानंतर आता राजधानी बीजिंगमध्ये पुन्हा एकदा करोनाबाधित आढळल्यामुळे प्रशासनाने खबरदारीचे उपाय आखण्यास सुरुवात केली आहे. चीनमध्ये करोनाची दुसरी लाट आली का, यावरही जोरदार चर्चा झडू लागल्या आहेत.

गुरुवारी, राजधानी बीजिंगमध्ये ५६ दिवसांनंतर करोनाबाधित रुग्ण आढळल्याची नोंद झाली. बीजिंगमधील शिचेंग भागात करोनाबाधित रुग्ण आढळला असल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली होती. परदेशांतून येणारे, तसेच इतर शहरांतून बीजिंगमध्ये येणाऱ्यांना सक्तीने क्वारंटाइन करण्याचे धोरण चिनी अधिकाऱ्यांनी अवलंबिले आहे. राजधानीतील रुग्ण संपल्यामुळे येथे सुरक्षित वावराचे नियम शिथिल करण्यात आले होते. मास्क न वापरण्याचीही सवलत देण्यात आली होती. मात्र, बीजिंगमध्ये पु्न्हा एकदा काही भागांमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. नवीन आढळलेले काही रुग्णांचा दक्षिण बीजिंग भागातील एका मांस विक्री बाजाराशीही संबंध आला असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, वुहानमध्ये मागील महिन्यात आढळलेल्या करोनाबाधितांमध्ये आजाराची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. करोनाच्या या 'गुप्त' हल्ल्ल्याने चीनमधील आरोग्य यंत्रणा खडबडून जाग्या झाल्यात. वुहानमध्ये नवीन रुग्ण आढळल्यानंतर सर्वच नागरिकांची करोना चाचणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. वुहानची लोकसंख्या एक कोटी १० लाखांच्या घरात आहे. एप्रिलमध्ये वुहानमधील लॉकडाउन ७६ दिवसांनंतर हटवण्यात आला होता.

Recent Posts