loader
Foto

भारत म्हणजे 'सडलेला सफरचंद'; अमेरिकन शास्त्रज्ञाचे संतापजनक वक्तव्य

वॉशिंग्टन: करोनाच्या संसर्गाने जगभरात थैमान घातले आहे. सर्वच देश आपल्या परीने करोनाच्या संसर्गावर मात करण्याचे प्रयत्न करत आहेत. करोनाच्या या लढाईत अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स विद्यापीठातील शास्त्रज्ञ स्टीव हँक यांनी भारतासह सात देशांना सडलेले सफरचंद म्हटले आहे. हँक यांनी भारत सरकारवरही टीका केली आहे.

प्रा. स्टीव हँक यांनी ट्विटरवर भारतासह व्हेनेझुएला, इजिप्त, सीरिया, येमेन, तुर्की आणि चीनवर टीका केली आहे. हे पाचही करोना संसर्गाच्या डेटाबाबत 'सडलेले सफरचंद' असल्याची टीका केली आहे. हे देश करोनाशी संबंधित आकडेवारी माहिती देत नाहीत अथवा संशयित आकडेवारी देत आहेत. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये विद्यापीठाच्या आकडेवारीचा ग्राफ शेअर केला आहे. त्यामध्ये भारताला सडलेला सफरचंद म्हटले आहे.

भारतात फार कमी प्रमाणावर करोनाची चाचणी होत असून इटलीसारखी परिस्थिती उद्भवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. याआधीदेखील हँक यांनी भारत करोनाविरोधात करत असलेल्या उपाययोजनांवरही त्यांनी टीका केली होती.

जगभरात करोनाचा हाहाकार सुरू आहे. ब्राझील सध्या करोना संसर्गाचे मुख्य केंद्र झाले आहे. ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, करोनाच्या संसर्गामुळे आतापर्यंत ४१ हजार ८२८ जणांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमधील मृतांची संख्या ही ब्रिटनपेक्षाही अधिक झाली आहे. अमेरिकेत सर्वाधिक करोनाबाधित असून मृतांच्या संख्याही एक लाखाहून अधिक झाली आहे. मृतांच्या संख्येत ब्राझीलचा दुसरा क्रमांक असून मागील २४ तासांमध्ये ९०९ जणांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये सर्वाधिक रुग्ण असलेल्या साओ पाउलोमध्ये चार तास दुकाने आणि मॉल सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
 

Recent Posts