loader
Foto

डॅरेन सॅमीच्या वादात आता स्वरा भास्करने घेतली उडी, भारतीय खेळाडूंवर भडकली...

वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमीने काही दिवसांपूर्वी भारतीय खेळाडूंवर वर्णद्वेषाचा आरोप केला होता. त्यानंतर सॅमीने भारतीय खेळाडूंना धमकीही दिल्याचे पाहायला मिळाले होते. त्यावेळी भारतीय चाहत्यांनी सॅमीला चांगलेच फटकारले होते. पण आता बॉलीवूड स्टार स्वरा भास्करने या वादात उडी घेतली आहे. सॅमीला फटकारण्याऐवजी स्वरा यावेळी भारतीय खेळाडूंवरच भडकलेली पाहायला मिळत आहे.

आयपीएलमध्ये खेळत असताना मला भारताचे खेळाडू 'कालू' या नावाने हाक मारायचे. मला त्यावेळी या शब्दाचा अर्थ समजला नव्हता. पण आता मला या शब्दाचा अर्थ समजला असून माझ्याबरोबर भारतीय खेळाडूंनी वर्णद्वेष केला आहे. त्यामुळे या खेळाडूंनी जर मला आता प्रतिसाद दिला नाही तर त्यांचे नाव जगापुढे उघड करेन, अशी धमकी सॅमीने भारतीय खेळाडूंना दिली होती. त्यानंतर सॅमीबरोबर आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबाद या संघात खेळणाऱ्या इरफान पठाणने ही गोष्ट नाकारली होती. सॅमीबाबत अशी कोणतीच गोष्ट घडली नसल्याचे त्याने सांगितले होते. पण सॅमी ही गोष्ट ऐकायला तयार नव्हता.

हैदराबादच्या संघाकडून खेळणारा भारताचा माजी वेगवान गोलंदाज इशांत शर्माने काही वर्षांपूर्वी आपल्या संघातील काही खेळाडूंचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमध्ये सॅमीही होता. या फोटोमधील सॅमीला इशांतने कालू असे म्हटल्याचे सर्वांपुढे आले होते. त्यामुळे आता इशांतची कारकिर्द धोक्यात आली असल्याचेही म्हटले जात होते.

या सर्व वादात आता बॉलीवूड स्टार स्वरा भास्करने उडी घेतली आहे. स्वराने यावेळी भारतीय खेळाडूंची बाजू न घेता त्यांच्यावर भडकली असल्याचे आता पुढे आले आहे.

Recent Posts