loader
Foto

अमेरिका: आंदोलनानंतर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना

वॉशिंग्टन: अमेरिकेत सुरू असलेल्या वर्णद्वेषाविरोधातील आंदोलनाला आक्रमक वळण लागले आहे. त्यामुळे काही ठिकाणी तोडफोड, जाळपोळीच्या घटना घडत आहेत. राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये असणाऱ्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. काही अज्ञात लोकांनी हे कृत्य केले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

भारतीय दूतावासाच्या आवारात हा महात्मा गांधींचा पुतळा आहे. ही घटना घडण्याच्या काही तास आधी जवळच वर्णद्वेषविरोधी आंदोलकांनी आंदोलन केले होते. आंदोलक निघून गेल्यानंतर काही अज्ञात लोकांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना केली. पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे. विटंबनेचा प्रकार घडल्यानंतर हा पुतळा झाकून ठेवण्यात आला आहे. या घटनेनंतर भारतातील अमेरिकन दूतावासाने भारतीयांची माफी मागितली आहे.

अमेरिकेत विविध ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. जॉर्ज फ्लॉइडची पत्नी रॉक्सी वॉशिंग्टन मिनिआपोलिसमध्ये आपली सहा वर्षांची मुलगी गियाना हिला घेऊन आंदोलनस्थळी आली होती. पत्रकारांसमोर बोलताना रॉक्सी वॉशिंग्टन म्हणाल्या, 'या लहानगीने आपले प्रेमळ वडील गमावले आहेत, हे साऱ्या जगाला कळू दे. आता तिला पदवीधर झालेली तो कधीच पाहू शकणार नाही. तो खूप चांगला होता, त्यामुळे मला त्याला न्याय मिळवून द्यायचा असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, पोलिसांच्या मारहाणीत जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय नागरिकाचा मृत्यू झाल्यामुळे नागरिकांच्या मनात खदखदणारा असंतोष मंगळवारी रात्रीच्या भव्य मोर्चांनंतर काहीसा शमला. देशातील सर्व प्रमुख शहरांत संचारबंदी झुगारून आंदोलक रस्त्यांवर उतरले. किरकोळ अपवाद वगळता गेले सात दिवस सुरू असलेला हिंसाचार मंगळवारी थांबला. देशभरात सुमारे ९००० आंदोलकांना अटक करण्यात आली.

Recent Posts