loader
Foto

पाकिस्तानमध्ये इंधन दरात कपात; भारतासोबत केली तुलना

इस्लामाबाद: एलपीजी गॅसच्या किंमतीत मोठ्या प्रमाणावर कपात करण्याचा निर्णय पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी घेतला आहे. दक्षिण आशियामध्ये पाकिस्तानमध्ये इंधन दर सर्वात कमी असल्याचा दावा इम्रान खान यांनी केला आहे.

भारताविरोधात सातत्याने ट्विट करणाऱ्या इम्रान खान यांनी इंधन दराची तुलना भारत आणि इतर देशांमधील दरांशी केली आहे. इम्रान यांनी म्हटले की, पेट्रोल, डिझेल आणि रॉकेलच्या दरात मोठ्या प्रमाणावर कपात केली आहे. दक्षिण आशियाई देशांमध्ये पाकिस्तानमधील इंधन दर सर्वाधिक कमी आहे. भारतात पाकिस्तानपेक्षाही दुप्पट दर असल्याचे त्यांनी म्हटले. बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळमध्ये ५० ते ७५ टक्के अधिक दर असल्याचे खान यांनी म्हटले.

दरम्यान, भारतात एलपीजीच्या दरात वाढ करण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजीच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे ही दरवाढ करण्यात आली आहे. या दरवाढीचा परिणाम पंतप्रधान उज्जवला गॅस योजनेच्या ग्राहकांवर होणार नसल्याचे इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने म्हटले आहे.

Recent Posts