loader
Foto

सीमा प्रश्नात तिसऱ्याची गरज नाही; चीनने अमेरिकेला ठणकावले

बीजिंग: भारत-चीन सीमा प्रश्नात मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवणाऱ्या अमेरिकेच्या प्रस्तावाला चीनने विरोध केला आहे. भारत आणि चीनमधील सीमा प्रश्नात आम्हाला मध्यस्थ म्हणून कोणाचीही आवश्यकता नसल्याचे चीनने ठणकावले आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियन यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत अमेरिकेचा प्रस्ताव धुडकावून लावला. त्याआधी चीनने सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सनेदेखील चीन व भारत दरम्यान सुरू असलेल्या सीमावादावर अमेरिकेच्या मध्यस्थीची आवश्यकता नसल्याचे म्हटले होते. भारत आणि चीन हे दोन्ही देश सीमा प्रश्न सोडवण्यास सक्षम असल्याचे 'ग्लोबल टाइम्स'ने म्हटले होते. 


दरम्यान, भारताने सूचक इशारा देत अमेरिकेचा मध्यस्थीचा प्रस्ताव फेटाळून लावला. सीमावादाच्या मुद्द्यावर चीनसोबत चर्चा सुरू आहे. आम्ही चीनच्या संपर्कात आहे आणि शांततेच्या मार्गातून समाधानकारक तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले.

Recent Posts