loader
Foto

'ज्यांनी सोनियांच्या नावानं शपथ घेतली, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार?'

मुंबई: आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्या आंदोलकांसाठी फडणवीस सरकारनं सुरू केलेली योजना बंद करण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयावर भाजपनं जोरदार टीका केली आहे. 'ज्यांनी सोनिया गांधी यांच्या नावानं शपथ घेतली, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार,' असा खोचक टोला भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी हाणला आहे. (BJP MLA Ashish Shelar attacks Thackeray Sarkar over scraping emergency pension scheme)

आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्या व्यक्तींसाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मानधन योजना सुरू केली होती. १९७५ ते १९७७ या काळात तत्कालीन सरकारविरुद्ध लोकशाहीसाठी लढा देताना तुरुंगात गेलेल्यांसाठी ही योजना होती. एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्या व्यक्तींना मसिक दहा हजार व त्यांच्या पश्च्चात त्यांच्या पत्नीस किंवा पतीस पाच हजार व एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक रुपये पाच हजार व त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस किंवा पतीस रुपये अडीच हजार रुपये मानधन सुरू करण्यात आले होते.

Recent Posts